Home /News /coronavirus-latest-news /

बनावट लस घेतल्यानंतर महिला खासदाराची प्रकृती बिघडली, 4 दिवसांपूर्वी झाला होता खुलासा

बनावट लस घेतल्यानंतर महिला खासदाराची प्रकृती बिघडली, 4 दिवसांपूर्वी झाला होता खुलासा

महिला खासदाराला Fake Vaccination चा फटका बसू शकतो, तर सर्वसामान्यांच काय?

    कलकत्ता, 26 जून : कोरोना व्हायरसपासून (Coronavirus) बचाव करण्यासाठी देशभरात लसीकरणाचा वेग वाढविण्यात आला आहे. यादरम्यान तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) यांना बनावटी लसीकरणाच्या फटका सहन करावा लागत आहे. यापूर्वी त्यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली होती. लसीकरणानंतर त्यांनी प्रकृती ठीक असल्याचं सांगितलं होतं. मात्र लस घेतल्याच्या चार दिवसांनी मिमी चक्रवर्ती आजारी पडल्या आहेत. काय आहे प्रकरणं? बनावटी लसीकरण मोहीमेत कशा अडकल्या खासदार? टीएमसी खासदार मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) यांनी सांगितलं की, त्यांना लसीकरण शिबिरासाठी निमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी त्यांना सांगण्यात आलं होतं की, कलकत्ता म्युनिसिपट कॉर्पोरेशनचे सहआयुक्तांच्यावतीने ट्रान्सजेंडर आणि अपंगांसाठी मोफत लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आलं आहे. आयएएस अधिकारी असल्याचं सांगून तत्सम व्यक्तीने त्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन केलं होतं. यानंतर मी तेथे गेले आणि लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी लसीकरण केलं. हे ही वाचा-परिस्थिती गंभीर! 8 राज्यांतच डेल्टाची 50% प्रकरणं; सर्वाधिक रुग्ण महाराष्ट्रात कसा झाला खुलासा? मिमी चक्रवर्ती (Mimi Chakraborty) यांनी सांगितलं होतं की, कोरोना लस (Corona Vaccine) लावल्यानंतर जेव्हा मला कोणताही मेसेज आला नाही, तेव्हा मी लसीकरण प्रमाणपत्राबाबत विचारलं. तीन-चार दिवसात मिळेल, असं त्यावेळी मला सांगण्यात आलं. तेव्हा मला शंका आली, यानंतर मी लसीकरण थांबवलं आणि पोलिसांना याची सूचना दिली. कलकत्ता साउथ डिव्हिजनचे जीसी राशिद मुनीर खान यांनी सांगितलं की, या प्रकरणात आरोपी देबांजन देब याला अटक करण्यात आली आहे. त्याने सांगितलं की, लशींच्या मात्रेची खरेदी आरोग्य भवनाबाहेर आणि बागरी बाजारात केली. तरी या लशी तपासासाठी पाठविण्यात आल्या आहेत. त्यातून नेमका प्रकार लक्षात येईल. देबांजन देबने स्वत: आयएएस असल्याचा दावा केला होता आणि मिमी चक्रवर्ती यांना शिबिरात आमंत्रित केलं होतं.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona vaccination, Coronavirus, TMC, West bangal

    पुढील बातम्या