मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

कोरोनाच्या उद्रेकामुळे कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांनीही घेतला मोठा निर्णय

कोरोनाच्या उद्रेकामुळे कल्याण-डोंबिवलीच्या आयुक्तांनीही घेतला मोठा निर्णय

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना बळावत असल्याने महापालिका आयुक्ताने कडक अॅक्शन घेण्यास सुरुवात केली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना बळावत असल्याने महापालिका आयुक्ताने कडक अॅक्शन घेण्यास सुरुवात केली आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना बळावत असल्याने महापालिका आयुक्ताने कडक अॅक्शन घेण्यास सुरुवात केली आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

डोंबिवली, 26 मार्च : कल्याण-डोंबिवली महानगर पालिका क्षेत्रात कोरोना बळावत असल्याने महापालिका आयुक्ताने कडक अॅक्शन घेण्यास सुरुवात केली आहे. नवीन आदेशानुसार दर शनिवारी आणि रविवारी महापालिका क्षेत्रात कोरोनाची कडक नियमावली जाहीर करण्यात आली आहे. (Kalyan-Dombivali big decision due to the outbreak of corona). आयुक्तांनी दर शनिवारी आणि रविवारी नियम अधिक कडक केले असून खालील दिलेल्या नियमांचं पालन करणं सर्व नागरिकांसाठी बंधनकारक असणार आहे.

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेच्या प्रतिबंधात्मक (शनिवार-रविवार) योजनेनुसार...

-अत्यावश्य सेवा आणि जीवनावश्यक वस्तू, मेडिकल दुकाने, वैद्यकीय सेवा, किराणा, दूध, वृत्तपत्रं, पेट्रोलपंप वगळून सर्व प्रकारच्या आस्थापना पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. -फेरीवाले, हातगाडीवरील विक्रेत्यांवरही बंदी घालण्यात आली आहे.

-महापालिका क्षेत्रातील भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील.

-हॉटेल्स, बार, रेस्टॉरंट, पोळी भाजी केंद्र आदी पार्सल सुविधा सुरू राहिलं.

-जारी केलेल्या योजनेनुसार दर शनिवारी आणि रविवारी कोणत्याही प्रकारची आस्थापना खुले राहणार नाहीत, याची खबरदारी घ्यावीत.

-या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्ती आणि संस्था यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल.

-हॉटस्पॉट क्षेत्रांमध्ये यापूर्वीच्या आदेशानुसार घालण्यात आलेले सर्व निर्बंध कायम ठेवण्यात येत आहे.

-वरील आदेश 27 मार्च 2021 पासून पुढील आदेश येईपर्यंत दर शनिवार आणि रविवार लागू राहतील.

हे ही वाचा-Corona Breaking: '..तर 2 एप्रिलपासून पुण्यात लॉकडाऊन',अजित पवारांचे स्पष्ट संकेत

दरम्यान राज्यात कोरोना रुग्णांची वाढलेली संख्या लक्षात घेता गर्दी टाळणे, वाढत्या संसर्गाला रोखण्यासाठी काही कडक उपाययोजना लागू करणे आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करणे नाईलाजाने गरजेचे ठरत असल्याने संपूर्ण राज्यात रविवारी (दिनांक 28 मार्च 2021) रात्रीपासून जमावबंदी लावण्याची सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. यासंबंधीचे स्वतंत्र आदेश आजच मदत व पुनर्वसन विभागाकडून निर्गमित व्हावेत असेही ते म्हणाले.

First published:

Tags: Corona spread, Corona updates, Dombivali, Kalyan