ब्रिस्टल, 5 जानेवारी : कोविडचा (Covid - 19) नवा वेरिएंट ओमायक्राॅन. साउथ आफ्रिकेपासून याची सुरुवात झाली आणि आता जगातील अनेक देशांपर्यंत याने धडक दिली आहे. यासंदर्भात अनेक अभ्यासदेखील केले जात आहेत. हळूहळू ओमायक्रॉनची (New variant Omicron) अनेक लक्षणं समोर येत आहेत. नुकतच ओमायक्रॉनबाबत एक नवीन केस समोर आली आहे. (The child lost his eye sight in 7 days due to Omicron)
ज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग झालेल्या 9 वर्षांच्या मुलाची दृष्टी गेली. नाताच्या आधी मुलाला ओमायक्रॉनची लागण झाली होती. अवघ्या आठवड्याभरातच त्याची दृष्टी गेली. या घटनेनंतर परिसरात दहशत पसरली आहे. नाताळदरम्यान 9 वर्षांचा जॅक कोविड पॉझिटिव्ह झाला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याला कोविडची लागण झाल्याचं समोर आलं. या आजारात हळूहळू त्याची दृष्टी कमी होत गेली. कोविड टेस्ट केल्याच्या एका आठवड्याच्या आत त्याच्या डाव्या डोळ्याची दृष्टी गेली. याशिवाय ऑर्बिटल सेल्यूलाइटिसमुळे त्याचा डोळा पूर्णपणे बंद झाला आहे. हे एक स्किन संक्रमण असून काही वैज्ञानिकांनी याला व्हायरसशी जोडलं आहे.
ब्रिस्टलमध्ये राहणारे जॅक आता पूर्णपणे ठीक झाले आहे. मात्र कुटुंबीयांनी हा फोटो शेअर करून लोकांना आवाहन केलं आहे. मुलाची 37 वर्षीय आई एन्जेलाने सांगितलं की, त्याचा डोळा फाटेल की काय अशी भीती वाटते. त्याची त्वचा खेचली जात होती. आणि त्यावर नियंत्रण आणणं शक्य नव्हतं. 16 डिसेंबर रोजी कुटुंबीयांची कोविड टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर जॅकची डोळ्याची समस्या सुरू झाली.
हे ही वाचा-Coronavirus Update: 7 दिवस घरात आणि 3 दिवस ताप नको, नव्या Guidelines जारी
मुलाच्या आईने सांगितलं की, सुरुवातीला कम्प्युटर गेम खेळल्यामुळे असं झाल्याचं आम्हाला वाटलं. मात्र 22 डिसेंबर रोजी कोविड टेस्ट केल्यानंतर त्याच्या डाव्या डोळ्यात वेदना सुरू झाल्या. कम्पुटरमुळे हा त्रास होत असल्याचं आम्हाला वाटलं. मात्र नाताळच्या एक दिवस आधीपर्यंत त्याच्या डाव्या डोळ्याला सुज आली होती. शेवटी डॉक्टरांना दाखवल्यानंतर व्हायरसमुळे डोळ्यांना इजा झाल्याचं समोर आलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona spread, Corona updates