मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

अरे बापरे! सिंहांपाठोपाठ आता हत्तींनाही कोरोना? चाचणीमुळे उडाली खळबळ

अरे बापरे! सिंहांपाठोपाठ आता हत्तींनाही कोरोना? चाचणीमुळे उडाली खळबळ

28 हत्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

28 हत्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

28 हत्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

  • Published by:  Priya Lad

हैदराबाद, 08 जून : देशात कोरोनाव्हायरसने (Coronavirus) थैमान घातलेलं आहे. फक्त माणसांभोवतीच नव्हे तर आता प्राण्यांभोवतीही कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत आहे. सिंहांनंतर आता हत्तीपर्यंतही कोरोना (Elephants coronavirus) पोहोचला की काय अशी भीती व्यक्त केली जाते आहे. तामिळनाडूतील 28  हत्तींची कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

तामिळनाडूच्या मदुमलाई टायगर रिझर्व्हमधील हत्तींना कोरोनाची लागण झाल्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे. इथल्या 28 हत्तींची  कोरोना चाचणी करण्यात आली आहे.

या हत्तींचे नमुने उत्तर प्रदेशच्या इंडिनय वेटरिनरी रिसर्च इन्स्टिट्यूटमध्ये पाठवण्यात आले आहेत. सर्व हत्ती 2 ते 60 वयोगटातील आहेत. त्यांच्या रिपोर्टची प्रतीक्षा आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.

हे वाचा - डेल्टानंतर भारतात आणखी एक भयंकर कोरोना; पुण्यात सापडला सर्वात घातक स्ट्रेन

काही दिवसांपूर्वीच देशात पहिल्या प्राण्याचा कोरोनाने बळी घेतला. एका कोरोना पॉझिटिव्ह सिंहाचा मृत्यू झाला होता. तामिळनाडूच्या अरिगनर अण्णा प्राणीसंग्रहायातील (Arignar Anna Zoological Park) एका सिंहाचा मृत्यू झाला आहे. तर आणखी आठ सिंह कोरोना पॉझिटिव्ह आहेत.

मे महिन्यात प्राणीसंग्रहालयातील सफारी पार्कमध्ये पशुवैद्यकीय पथकाला प्राण्यांच्या देखभालवेळी सिंहांना भूक न लागणं, नाकातून पाणी येणं, कफ यांसारख्या समस्या आढळल्या होत्या. त्यावरूनच त्यांची टेस्ट करण्यात आली आहे.  अकरा सिंहांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. त्यापैकी नऊ सिंहांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता.

हे वाचा - डेल्टानंतर भारतात आणखी एक भयंकर कोरोना; पुण्यात सापडला सर्वात घातक स्ट्रेन

भारतात प्राण्यांना कोरोनाची लागण होण्याचं हे पहिलंच प्रकरण. दरम्यान आता हत्तींच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट काय येईल, याकडे लक्ष लागलं आहे.

First published:

Tags: Coronavirus, Elephant