24 तासांत पुन्हा सापडले 60 हजारहून अधिक रुग्ण, मृतांच्या आकड्यातही विक्रमी वाढ

24 तासांत पुन्हा सापडले 60 हजारहून अधिक रुग्ण, मृतांच्या आकड्यातही विक्रमी वाढ

भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 24 लाख पार झाला आहे. देशात सध्या आता 24 लाख 61 हजार 190 रुग्ण आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा गेल्या काही दिवसांपासून वेगानं वाढत आहे. गेल्या 24 तासांतही 66 हजार 552 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 1007 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह भारतातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 24 लाख पार झाला आहे. देशात सध्या आता 24 लाख 61 हजार 190 रुग्ण आहेत.

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशातल कोरोनाचे 6 लाख 61 हजार 595 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, कोरोनामुळे आतापर्यंत 48 हजार 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकमेव दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 17 लाख 51 हजार 555 रुग्ण निरोगी झाले आहेत.

वाचा-Covaxin ची पहिली ट्रायल यशस्वी, नागपूरातील रुग्णांवर असा दिसला परिणाम

राज्यांची स्थिती

महाराष्ट्रात गुरुवारी पहिल्यांदाच सर्वात जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गुरूवारी तब्बल 413 जणांचा मृत्यू झाला. राज्याचा मृत्यू दर हा 3.4 टक्के एवढा असून तो देशाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. राज्यात आज 11 हजार 813 नवीन रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे रुग्णांची एकूण संख्या ही 5 लाख 60 हजार 126 एवढी झाली आहे. राज्यात आज नऊ हजार 115 रुग्ण बरे झाले असून आत्तापर्यंत एकूण 3 लाख 90 हजार 958 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 69.8 टक्के इतका आहे.

वाचा-विदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना आता क्वारंटाइनमध्ये सुट, पण एका अटीवरच!

Covaxin च्या पहिल्या ट्रायलचा निकाल आला

भारत बायोटेकद्वारे (Bharat Biotech) तयार केलेल्या लशीच्या तपासणीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. भारत बायोटेकद्वारे बनविल्या जाणाऱ्या Covaxin च्या दुसऱ्या टप्प्याच्या तपासणीची तयारी केली जात आहे. या दुसऱ्या टप्प्यात स्वयंसेवकांची ओळख पटविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. असा विश्वास आहे की सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात ट्रायलला सुरूवात होईल.

वाचा-रिअल हिरो! PPE सूट काढता कित्येक लिटर निघालं घामाचं 'पाणी', पाहा VIDEO

सीरम इन्स्टिट्यूटही लवकरच देणार लस

दरम्यान, भारताची आणखी एक कोरोना लस फेज 2 आणि 3च्या तयारीत आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) यांना ऑक्सफर्ड आणि अ‍ॅस्ट्रॅजेनेका विद्यापीठाने तयार केलेली लस इंडिया COVISHIELD ला फेज 2 आणि 3 चाचणी घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. आहे. एसआयआय दोन आठवड्यांपेक्षा कमी कालावधीत मानवी चाचणी सुरू करण्याची योजना आखत आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 14, 2020, 10:02 AM IST

ताज्या बातम्या