Home /News /coronavirus-latest-news /

आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका; सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला पुन्हा फटकारलं

आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका; सर्वोच्च न्यायालयानं केंद्राला पुन्हा फटकारलं

सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारला सल्ला देत म्हटलं आहे, की तुम्ही आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका. दिल्लीला (Delhi) दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा (Oxygen Supply) करण्याचे आदेश न्यायालयानं दिले आहेत.

पुढे वाचा ...
    नवी दिल्ली 07 मे: दिल्लीला ऑक्सिजन पुरवठा (Oxygen Supply) करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) केंद्र सरकारला सल्ला देत म्हटलं आहे, की तुम्ही आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका. दिल्लीला (Delhi) दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने हे विधान केलं आहे. दिल्ली सरकारच्यावतीनं न्यायालयात असं सांगितलं गेलं, की न्यायालयाच्या आदेशानंतरही दिल्लीला दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा होत नाहीये. यानंतर न्यायालयानं केंद्राला आदेश दिला आहे, की जोपर्यंत आदेशात काही बदल केला जात नाही तोपर्यंत दररोज दिल्लीला 700 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवठा करावा लागेल. न्यायालयात केंद्र सरकारची बाजू मांडत असलेल्या सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांना खंडपीठानं म्हटलं, की आम्हाला कठोर निर्णय घेण्यास भाग पाडू नका. आपल्या अधिकाऱ्यांना दिल्लीला दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचे आदेश द्या. याआधी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला म्हटलं होतं, की दिल्लीतील कोरोना रुग्णांसाठी दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजन पुरवला गेला पाहिजे. न्यायालयानं म्हटलं होतं, की लपविण्यासारखे काही नसल्यास सरकारने पुढे येऊन देशाला सांगावं की ऑक्सिजनचे वाटप कसं केलं जातं आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारकडे दररोज 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची मागणी केली आहे. त्यांचं असं म्हणणं आहे, की दिल्लीत एकाही रुग्णाचा ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे मृत्यू होऊ नये, यासाठी 700 मेट्रिक टन ऑक्सिजन मिळणं फायद्याचं ठरेल. केजरीवाल गुरुवारी म्हणाले, की आम्हाला ऑक्सिजनचा योग्य प्रकारे पुरवठा झाल्यास आम्ही दिल्लीमध्ये 9,000 ते 9,500 बेडची व्यवस्था करू शकेल. आम्ही ऑक्सिजन बेड तयार करू शकेल. मी तुम्हाला विश्वास देतो, की 700 मे. टन ऑक्सिजन सप्लाय झाल्यास ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे एकाही रुग्णाचा मृत्यू होणार नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
    Published by:Kiran Pharate
    First published:

    Tags: Coronavirus, Delhi, Oxygen supply, Supreme court

    पुढील बातम्या