Home /News /coronavirus-latest-news /

कोरोनाच्या गंभीर आजारावर जीवनदान ठरू शकतं 'हे' औषध, मृत्यूचा धोका 20% कमी

कोरोनाच्या गंभीर आजारावर जीवनदान ठरू शकतं 'हे' औषध, मृत्यूचा धोका 20% कमी

पुण्यात 899 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 504 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

पुण्यात 899 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 504 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत.

WHO क्लिनिकल केअर लीड जेनेट डायझ यांनी सांगितले की एजन्सीने गंभीर आणि लक्षणीय COVID-19 सह रूग्णांमध्ये स्टेरॉइड वापरासाठी शिफारस केली आहे.

    लंडन, 03 सप्टेंबर : जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असताना सर्वांचे लक्ष कोरोना लशीकडे लागले आहे. जगभरातील 117 कंपन्या कोरोनाची लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत, मात्र तोपर्यंत कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी औषधांचा वापर केला जात आहे. कोर्टीकोस्टेरॉईड (Steroid) औषधांमुळे कोव्हिड-19 रूग्णांवर उपचार केल्यास मृत्यूचा धोका 20% कमी होतो. बुधवारी सात आंतरराष्ट्रीय चाचण्यांचे विश्लेषण केल्यानंतर असे निष्कर्ष काढण्यात आले आहे. हे विश्लेषण कमी डोस असलेले हायड्रोकार्टिझोन, डेक्सामेथासोन आणि मेथिलप्रेडिसोलोनच्या स्वतंत्र चाचण्यांमधून डेटा गोळा केला. यात असे आढळले की स्टेरॉईड रुग्णांच्या रिकव्हरीसाठी जास्त फायद्याचे आहे. वाचा-कोरोनाव्हायरस हृदयावर करतोय परिणाम; बऱ्या झालेल्या 78% रुग्णांना हृदयाची समस्या संशोधकांनी एका निवेदनात म्हटले आहे की, स्टेरॉइडच्या उपचारानंतर 68% रूग्ण निरोगी होऊ शकतात. WHO क्लिनिकल केअर लीड जेनेट डायझ यांनी सांगितले की एजन्सीने गंभीर आणि लक्षणीय COVID-19 सह रूग्णांमध्ये स्टेरॉइड वापरासाठी शिफारस केली आहे. WHOच्या एका कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, स्टेरॉइडच्या वापरामुळे1000 रूग्णांमध्ये 87 मृत्यू कमी झाले आहेत. यामुळे 20 टक्के मृत्यूचे प्रमाण कमी झाले आहे. वाचा-50 वर्षापर्यंतच्या रुग्णांच्या शरीरातून इतक्या दिवसात जातो कोरोना स्टेरॉयड स्वस्त औषध ब्रिस्टल, यूके युनिव्हर्सिटीमध्ये कार्यरत असलेले प्राध्यापक जोनाथन स्टर्न म्हणाले, स्टेरॉयड एक स्वस्त आणि सहज उपलब्ध औषध आहे आणि आमच्या विश्लेषणाने हे सिद्ध केले आहे की COVID-19 रुग्णांमध्ये त्यांचा सर्वाधिक परिणाम झाला आहे. मृत्यू कमी करण्यात प्रभावी आहेत. ते म्हणाले की ब्रिटन, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, स्पेन आणि अमेरिकेच्या संशोधकांनी घेतलेल्या चाचण्यांमध्येही हेच आढळून आले आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine

    पुढील बातम्या