Home /News /coronavirus-latest-news /

महिलांना लाँग कोविड होण्याची शक्यता अधिक; संशोधनात दिसून आली 'ही' लक्षणं

महिलांना लाँग कोविड होण्याची शक्यता अधिक; संशोधनात दिसून आली 'ही' लक्षणं

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

महिला आणि पुरुषांमध्ये लॉंग कोविडची (Long Covid) वेगवेगळी लक्षणं दिसून येत आहेत. पुरुषांच्या (Men) तुलनेत महिलांना (Women) लॉंग कोविडचा अधिक त्रास होत असून, लक्षणंही वेगवेगळी दिसत आहेत.

    मुंबई, 19 जुलै : गेल्या सुमारे अडीच वर्षांपासून जगभरात कोरोनाचा (Corona) कहर आहे. अडीच वर्षांत कोरोनाचे अल्फा, बीटा, डेल्टा, ओमिक्रॉन आदी व्हॅरिएंट्स (Variant) आढळून आले आहेत. कोरोनाला रोखण्यासाठी लसीकरणावर (Vaccination) भर दिला जात आहे. सध्या भारतात (India) कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढताना दिसत आहे. देशभरात अ‍ॅक्टिव्ह केसेसची संख्या 1.4 लाखांवर पोहोचली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 98 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. परंतु, रुग्ण बरे झाल्यानंतरही कोरोना त्यांची पाठ सोडत नसल्याचं दिसून आलं आहे. महिला आणि पुरुषांमध्ये लॉंग कोविडची (Long Covid) वेगवेगळी लक्षणं दिसून येत आहेत. पुरुषांच्या (Men) तुलनेत महिलांना (Women) लॉंग कोविडचा अधिक त्रास होत असून, लक्षणंही वेगवेगळी दिसत आहेत. 'झी न्यूज हिंदी'ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे. कोरोनातून बरं झाल्यानंतरदेखील अनेक रुग्णांमध्ये दीर्घ काळ लक्षणं दिसत आहेत. ही लक्षणं लॉंग कोविडची मानली जात आहेत. या अनुषंगाने कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींवर नुकतंच एक संशोधन करण्यात आलं. या संशोधनात लॉंग कोविडला पुरुषांपेक्षा महिला जास्त बळी ठरत असल्याचं दिसून आलं आहे. महिलांना दीर्घ काळापर्यंत कोविड सिंड्रोमचा (Covid Syndrome) त्रास होण्याची शक्यता असते, असं या संशोधनातून स्पष्ट झालं आहे. सर्वसामान्यपणे थकवा, डोकेदुखी, एकाग्रता कमी होणं, श्वास घेण्यास त्रास होणं, सांधेदुखी ही लॉंग कोविडची लक्षणं आहेत. याशिवाय ब्रेन फॉग, शरीर सुन्न होणं, मुंग्या येणं, आतड्यांची समस्या, अनिद्रा, कानात आवाज येणं, चक्कर येणं आणि दृष्टी अंधुक होणं यांसारखी काही लक्षणं लॉंग कोविड झालेल्या रुग्णांमध्ये दिसून येतात. (बँक कर्मचाऱ्याचा सिनेस्टाईल 34 कोटींवर डल्ला, डोंबिवलीतील बॅंक चोराने उडवली जगातील सर्व बॅंकांची झोप) महिलांच्या तुलनेत पुरुषांमध्ये दिसून येणारी लॉंग कोविडची लक्षणं काहीशी वेगळी आहेत. पुरुषांमध्ये डायबेटीस (Diabetes), किडनी विकार, फुफ्फुसांशी संबंधित त्रास, शरीर सुन्न होणं, मुंग्या येणं, सांधेदुखी, छातीत दुखणं अशी लक्षणं कोरोनानंतरही दिसून येतात. या संशोधनात लॉंग कोविडची लक्षणं पुरुष आणि महिलांमध्ये वेगवेगळी दिसून आली. महिलांमध्ये प्रामुख्यानं मूड ऑफ होणं (Mood off), डोकेदुखी, त्वचेशी संबंधित समस्या, पचनासंबंधी तक्रारी, थकवा आणि गॅस्ट्रोइंटेस्टिनल विकार ही लॉंग कोविडची लक्षणं दिसून येतात. 'करंट मेडिकल रिसर्च अ‍ॅंड ओपिनियन' या पीअर-रिव्ह्यू जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या या संशोधनातून महिलांमध्ये कोरोना विषाणूची दीर्घकालीन लक्षणं दिसून येण्याची शक्यता पुरुषांच्या तुलनेत 22 टक्क्यांपर्यंत जास्त असते, असं दिसून आलं आहे. त्यामुळे महिलांनी कोरोनातून बरं झाल्यानंतरही आरोग्याची पूर्ण काळजी घेणं, तसंच शारीरिक समस्या जाणवत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
    First published:

    Tags: Corona, Corona updates

    पुढील बातम्या