मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Hotel package मध्ये कोरोना लस देणं बंद करा; मोदी सरकारचे राज्यांना आदेश

Hotel package मध्ये कोरोना लस देणं बंद करा; मोदी सरकारचे राज्यांना आदेश

कोरोनाला हलक्यात घेऊ नका. कोरोना संक्रमण कोणालाही होऊ शकतो. कोरोना पासून वाचण्यासाठी सगळे नियम पाळा. आता सरकारने 18 वर्षांवरील मुलांसाठी लसीकरणाला परवानगी दिली आहे. पण लहान मुलांसाठी अद्याप व्हॅक्सिनेशन उपलब्ध नाही.

कोरोनाला हलक्यात घेऊ नका. कोरोना संक्रमण कोणालाही होऊ शकतो. कोरोना पासून वाचण्यासाठी सगळे नियम पाळा. आता सरकारने 18 वर्षांवरील मुलांसाठी लसीकरणाला परवानगी दिली आहे. पण लहान मुलांसाठी अद्याप व्हॅक्सिनेशन उपलब्ध नाही.

काही खासगी रुग्णालयांनी कोरोना लसीकरणासाठी हॉटेलसोबत (Hotel package for corona vaccination) करार केला आहे.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 29 मे :  जास्तीत जास्त लोकांचं कोरोना लसीकरण व्हावं, यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सरकारी लसीकरण केंद्राप्रमाणेच खासगी रुग्णालयातही लस दिली जाते आहे. पण काही खासगी रुग्णालयांनी लसीकरणासाठी हॉटेल पॅकेज (Hotel package for corona vaccination) दिले आहेत. असे पॅकेज देणं थांबवा असे आदेश मोदी सरकारने दिले आहेत.

कोरोना लसीकरणाबाबत केंद्रीय आरोग्य सचिवांनी सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र दिलं आहे. ज्यामध्ये खासगी रुग्णालयांमार्फत दिल्या जाणाऱ्या कोरोना लसीकरण हॉटेल पॅकेजबाबत नाराजी व्यक्त केली आहे. हॉटेल पॅकेजमध्ये कोरोना लस देणं थांबवा असे आदेश केंद्राने दिले आहेत.

काही खासगी रुग्णालयांनी कोरोना लसीकरणासाठी हॉटेल्ससोबत करार केला आहे. ज्यामध्ये हॉटेलमध्ये लक्झरी सुविधांसोबत लसीकरणही ऑफर केली जाते आहे. हे राष्ट्रीय कोरोना लसीकरण मोहिमेच्या गाइडलाइन्सच्या विरोधात आहेत. त्यामुळे अशा हॉटेल पॅकेजसह हॉटेलमध्ये कोरोना लसीकरण तात्काळ बंद करा. हैदराबादमधील Radisson हॉटेलमध्येही असं पॅकेज दिलं जात होतं.

हे वाचा - कोरोनाने हिरावलं आईबाबांचं छत्र; कोविडमुळे अनाथ मुलांसाठी मोदी सरकार बनलं मायबाप

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं कोरोना लसीकरण फक्त चार ठिकाणीच होईल. एक सरकारी कोरोना लसीकरण केंद्र, दुसरं खासगी रुग्णालयांमार्फत चालवलं जाणारं प्रायव्हेट कोरोना लसीकरण केंद्र, तिसरं सरकारी कार्यालयांच्या कार्यस्थळांवरील आणि प्रायव्हेट कंपन्यांनी ऑफिसेसमध्येच खासगी रुग्णालयांमार्फत सुरू केलंलं लसीकरण. चौथं वयस्कर आणि दिव्यांग व्यक्ती ज्यांना घराजवळ कोरोना लसीकरण केंद्र उपलब्ध करून देण्यात आलं आहे. हे केंद्र आरडब्ल्यूए, हाऊसिंग सोसायटी, कम्युनिटी सेंटर, शाळा-कॉलेज, वृद्धाश्रम यासारख्या ठिकाणी आहे.

हे वाचा - लस घेण्यासाठी सेलिब्रिटी बनली चक्क सुपरवायझर; भाजपने केली चौकशीची मागणी

याशिवाय कोणत्याही ठिकाणी कोरोना लस दिली जाणार नाही हे केंद्राने स्पष्ट केलं आहे.

First published:

Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus