Home /News /coronavirus-latest-news /

Corona Update : राज्याचा रिकव्हरी रेट वाढला; कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 13 लाखांपार

Corona Update : राज्याचा रिकव्हरी रेट वाढला; कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या 13 लाखांपार

कालच्या तुलनेत आज कोरोना रिकव्हरी रेट वाढला आहे

    मुंबई, 17 ऑक्टोबर : राज्यात दररोज कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून आज 14 हजार 238 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.65 टक्के एवढे झाले आहे. आतापर्यंत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या साडे तेरा लाखांवर गेली असून राज्यातील उपचार सुरू असलेल्या कोरोना रुग्णांची संख्या देखील कमी होऊन 1 लाख 85 हजार 270 एवढी कमी झाली आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री  राजेश टोपे यांनी आज दिली. आजपर्यंत करण्यात आलेल्या 80 लाख 69 हजार 100 नमुन्यांपैकी 15 लाख 86 हजार 321 नमुने पॉझिटिव्ह (19.66 टक्के) आले आहेत. राज्यात  23 लाख 95 हजार 552 लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या 23 हजार 749 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज 250 कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात 13 हजार 885 रुग्ण बरे होऊन घरी गेलेत. त्यामुळे राज्यात कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 13 लाख 44 हजार 368 एवढी झाली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) 85.3 टक्के एवढे झाले. आज राज्यात दिवसभरात 11 हजार 447 नव्या रुग्णांचं निदान झालं. तर 306 जणांचा मृत्यू झालं. मृत्यूचं प्रमाण 2.63 एवढं झालं आहे. हे ही वाचा-कोरोना नियंत्रणाबरोबर न्युझीलँडच्या महिला पंतप्रधानांना मिळालं मोठं यश राज्यातील जिल्हानिहाय ॲक्टीव्ह रुग्णांचा तपशील मुंबई: बाधीत रुग्ण- (२,४०,३३५) बरे झालेले रुग्ण- (२,०७,४७४), मृत्यू- (९७३९), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(४५८), ॲक्टीव्ह रुग्ण- (२२,६६४) ठाणे: बाधीत रुग्ण- (२,११,६०६), बरे झालेले रुग्ण- (१,७६,३४४), मृत्यू (५१९७), इतर कारणांमुळे झालेले मृत्यू-(१), ॲक्टीव्ह रुग्ण- (३०,०६४) दरम्यान,  'माझं कुटुंबं, माझी जबाबदारी' या अभियानाचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. या अभियानाचाच एक भाग म्हणून 'पुण्याचा निर्धार, कोरोना हद्दपार', या अभियानाला पुणेकरांनी साथ द्यावी, असं आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आवाहन केलं. अजित पवारांच्या हस्ते पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक किटचे वाटप करण्यात आलं.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Corona virus in india, Mumbai

    पुढील बातम्या