24 तासांत तब्बल 66 हजार 999 रुग्णांची नोंद, वाचा किती आहे देशाचा रिकव्हरी रेट

24 तासांत तब्बल 66 हजार 999 रुग्णांची नोंद, वाचा किती आहे देशाचा रिकव्हरी रेट

गेल्या 24 तासांत रेकॉर्डब्रेक 66 हजार 999 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. याआधी 8 ऑगस्ट रोजी 65 हजार 156 नवी रुग्ण सापडले होते.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 ऑगस्ट : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 23 लाख 96 हजार 638 झाला आहे. गेल्या 24 तासांत रेकॉर्डब्रेक 66 हजार 999 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. एका दिवसात ही सर्वाधिक रुग्णांची आकडेवारी आहे. याआधी 8 ऑगस्ट रोजी 65 हजार 156 नवी रुग्ण सापडले होते. तर, एका दिवसात 942 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 6 लाख 53 हजार 622 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 47 हजार 33 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 16 लाख 95 हजार 982 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

वाचा-38 लोकांवर ट्रायल, 144 साइड इफेक्ट! रशियाच्या लशीबाबत धक्कादायक माहिती समोर

किती आहे रिकव्हरी आणि डेथ रेट?

देशातील कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. मृत्यूदरात घट होऊन 1.96% झाला आहे. तर, अॅक्टिव्ह प्रकरणातही घट होऊन 27.27% झाली आहे. त्याचबरोबर रुग्ण निरोगी होण्याच्या दरात वाढ झाली आहे. देशाचा रिकव्हरी रेट 70.76% आहे.

वाचा-खूशखबर! नोव्हेंबरमध्ये भारतालाही मिळणार कोरोनाची लस

राज्यांची परिस्थिती

महाराष्ट्र राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या ही आता साडेपाच लाखांच्या जवळ पोहोचली आहे. गुरुवारी दिवसभरात 12,712 नवे रुग्ण आढळले त्यामुळे राज्यातल्या एकूण रुग्णांची संख्या ही 5 लाख 48 हजार 313 एवढी झाली. तर 13,408 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सध्या नवे आढळणारे रुग्ण आणि डिस्चार्ज मिळाणारे रुग्ण यांची संख्या वाढलेली आहे.

वाचा-GOOD NEWS! 2 आठवड्यांत मिळणार कोरोना लस; रशियाने सुरू केलं उत्पादन

जगभरातील आकडेवारी

जगभरात कोरोना थैमान घालत आहेत. एका दिवसात जगभरात 2.75 लाख नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 6644 रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या जगभरात 2.07 कोटी एकूण रुग्ण आहेत. तर, आतापर्यंत 7 लाख 51 हजार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर, निरोगी रुग्णांचा आकडा एक कोटी 36 लाख पार झाला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 13, 2020, 10:36 AM IST

ताज्या बातम्या