नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा आता 26 लाख 47 हजार 664 झाला आहे. गेल्या 24 तासांत देशात 57 हजार 982 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 941 रुग्णांचा मृत्यू झाला. यासह आता एकूण मृतांची संख्या 50 हजार 921 झाली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, देशात सध्या 6 लाख 76 हजार 900 सक्रीय रुग्म आहेत. तर, 19 लाख 19 हजार 843 रुग्ण निरोगी झाले आहे.
इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 3 करोड़ 41 हजार 400 लोकांची चाचणी करण्यात आली आहे. रविवारी एकाच दिवसात 7 लाख 31 हजार 697 लोकांची चाचणी करण्यात आली.
Spike of 57,982 cases and 941 deaths reported in India, in the last 24 hours.
— ANI (@ANI) August 17, 2020
The #COVID19 tally in the country rises to 26,47,664 including 6,76,900 active cases, 19,19,843 discharged/migrated & 50,921 deaths: Ministry of Health and Family Welfare pic.twitter.com/Ihs6ueNBST
भारतातील मृतांचा आकडा 50 हजार पार झाला आहे. एकूण मृतांच्या संख्येत जगभरातील देशांमध्ये भारत चौथ्या क्रमांकावर आहे. भारताआधी अमेरिका, ब्राझील आणि मॅक्सिको यांचा क्रमांका लागतो. भारताचा मृत्यूदर 1.9%. आहे. तर रविवारच्या तुलनेत आज नवीन रुग्णांची संख्याही कमी झाली आहे.
महाराष्ट्राची आकडेवारी
राज्यात रविवारी नव्याने 11 हजार 111 कोरोना रुग्ण आढळून आलेत. तर 288 जणांचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने 10 हजारांच्या वरच रुग्णांची दररोज भर पडत आहे. गेल्या 24 तासांमध्ये 8836 रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आला. रुग्ण बरं होण्याचं प्रमाण हे 70 टक्क्यांवर गेलं असून मृत्यू दर 3.36 टक्क्यांवर आला आहे. तर कोविड रुग्णांची एकूण संख्या ही 5,95,865 एवढी झाली आहे. दिल्लीचा रिकव्हरी रेट 90% आहे तर महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट 70%. आहे. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्याही दक्षिण आफ्रिकेपेक्षा जास्त आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india