लखनऊ, 26 मे : कोरोना काळात काही भागात पोलिसांचं धक्कादायक रुप पाहायला मिळालं आहे. या तीन जिल्ह्यात पोलिसांनी क्रूरतेच्या सर्व सीमा पार केल्या. पहिली घटना बरेली जिल्ह्यातील आहे. येथे एका तरुणाला विनामास्क फिरल्यामुळे हात आणि पायावर पोलिसांनी खिळे ठोकल्याचा आरोप लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे रायबरेलीमध्ये 5 तरुणांना रात्रभर पोलीस चौकीत मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
बरेलीतील बारादरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे रंजीत याच्या हातात आणि पायात खिळे ठोकण्यात आले. बुधवारी तो पोलीस ठाण्यात पोहोचला. कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, तो रात्री साधारण 10 वाजता घराच्या बाहेर बसला होता. पोलीस रात्रीची गस्त घालत होते. यावेळी रंजीतला त्यांनी पकडलं. पोलीस त्याला ठाण्यात घेऊन गेले आणि हात-पायावर खिळे ठोकले. शिवाय रंजीतला खूप मारहाण करण्यात आल्याचा आरोपही त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे. रंजीतची आई शीला देवींनी ठाण्यात पोलिसांविरोधात तक्रार केली आहे. मात्र एसएसपी रोहीत सजवाण यांनी सर्व आरोप फेटाळले आहेत. ते म्हणाले की, तरुणाने 24 मे रोजी पोलिसांसोबत वाद घातला. त्याने मास्क लावला नव्हता. अटकेपासून बचाव करण्यासाठी तरुणाने स्वत:च हात व पायावर खिळे ठोकले आहे. दैनिक भास्करने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
हे ही वाचा-तू काळजी करू नको, आम्ही...'; आई Covid पॉझिटिव्ह, मुलांनी लिहिलं हृदयस्पर्शी पत्र
दुसऱ्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील मऊ जिल्ह्यातील आहे. येथे मोहम्मदाबादमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांनी तरुणाला मारहाण केल्याचं वृत्त समोर आलं आहे. त्याच्यावर आरोप आहे की, तरुण आपल्या घराबाहेर विनामास्क उभा होता. तेव्हा पोलिसांनी त्याला खेचत आणत मारहाण केली. याचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. तिसरी घटना रायबरेलीचा आहे. येथे आरोप आहे की, 5 तरुणांना रात्रभर सूची ठाण्यात बंद करून मारहाण केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Coronavirus, Lockdown, Police