Home /News /coronavirus-latest-news /

सिगरेट, तंबाखूचे सेवन करत असाल तर सावधान! कोरोनाच्या गंभीर लक्षणांचा धोका, सरकारचा इशारा

सिगरेट, तंबाखूचे सेवन करत असाल तर सावधान! कोरोनाच्या गंभीर लक्षणांचा धोका, सरकारचा इशारा

सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा आणि तंबाखू खाण्यावर बंदी कायम आहे.

सार्वजनिक ठिकाणी दारू, पान, गुटखा आणि तंबाखू खाण्यावर बंदी कायम आहे.

सरकारनं एक निर्देशक जारी केले आहे. यात तंबाखू आणि सिगरेटचे सेवन करणाऱ्यांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.

    नवी दिल्ली, 29 जुलै : देशातील कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहेत. कोरोनाबाधितांची संख्या आता 15 लाखांवर पोहचली आहे. यातच सरकारनं एक निर्देशक जारी केले आहे. यात तंबाखू आणि सिगरेटचे सेवन करणाऱ्यांना कोरोनाचा सर्वात जास्त धोका असल्याचे सांगण्यात आले आहे. सिगरेट किंवा तंबाखूचे सेवन करताना हाताचं बोट आणि ओठ यांच्यात सतत संपर्क होतो, त्यामुळे हाता वाटे तोंडात कोरोना प्रसार होऊ शकतो. तसेच तज्ज्ञांनी सिगरेट तंबाखूचे सेवन करणाऱ्यांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणांचा धोका असू शकतो, यामुळे रुग्णांचा मृत्यूही होण्याची शक्यता आहे. याचबरोबर पाइप आणि हुक्का यामुळे कोरोनाचा प्रसार होऊ शकतो. कोव्हिड-19 ट्रान्समिशनसाठी सिगरेट आणि तंबाखू वाहक ठरू शकतात, असा इशाराही सरकारने दिला आहे. दरम्यान, याआधी जागतिक आरोग्य संघटनेनही (WHO) सिगरेट पिणाऱ्या व्यक्तींमध्ये कोरोनाचा धोका सर्वात जास्त असल्याचे सांगितले होते. WHOने केलेल्या रिसर्चमध्ये सिगरेट आणि तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्यास, त्यांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते, कारण त्यांची फुफ्फुसं इतर रुग्णांच्या तुलनेत कमकुवत असतात. वाचा-मुंबईकरांनो सावधान! झोपडपट्टी परिसरात कोरोनाचे संक्रमण सर्वात जास्त - सर्व्हे वाचा-भारतातल्या COVID-19 रुग्णांची संख्या गेली 15 लाखांवर, जगात तिसरा क्रमांक दरम्यान, याआधी फ्रान्समध्ये झालेल्या एका अभ्यासात सिगरेट आणि तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींना कोरोनाची लागण होत नाही, किंवा ते वाहक नसतात, असे सिद्ध करण्यात आले होते. मात्र नव्या रिपोर्टनुसार एकूण रुग्णसंख्येपेक्षा 16% रुग्ण हे सिगरेट आणि तंबाखूचे सेवन करणारे आढळले आहेत. वाचा-भारतात 'कोरोना'साथ गेली तिसऱ्या टप्प्यात? NCDCच्या सर्व्हेत धक्कादायक निष्कर्ष एवढेच नाही तर पान, मसाला पान खाणेही धोकादायक ठरू शकतो. पान खाऊन रस्त्यावर थूंकणे, सर्वात जास्त धोकादायक आहे. कारण यामुळे पान खाणाऱ्या व्यक्तीस आणि इतरांनाही संसर्ग होऊ शकतो. WHOच्या रिपोर्टनुसार तंबाखू आणि निकोटीमुळे शरीर विशेषत: फुफ्फुसं कमकुवत होते, त्यामुळे रुग्णांचा मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. कोरोना व्हायरस थेट फुफ्फुसावर हल्ला करत असल्यामुळे तंबाखूचे सेवन करणाऱ्या व्यक्तींमध्ये केवळ कोरोनाच्या संसर्गाचा नाही तर, मृत्यूचाही धोका जास्त आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Coronavirus

    पुढील बातम्या