Home /News /coronavirus-latest-news /

क्या बात है! फक्त फोटो, सेल्फी नाही; तर SMARTPHONE CAMERA कोरोना टेस्टही करणार

क्या बात है! फक्त फोटो, सेल्फी नाही; तर SMARTPHONE CAMERA कोरोना टेस्टही करणार

SMARTPHONE CAMERA फक्त 30 मिनिटांत तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह की निगेटिव्ह हे सांगू शकतो

    वॉशिंग्टन, 09 डिसेंबर : स्मार्टफोनमधील (Smart Phone) कॅमेऱ्याचा (Camera) वापर आपण सामान्यपणे फोटो किंवा सेल्फी काढण्यासाठी करतो. पण त्याचा वापर करून कोरोना (Corona) चाचणी करणं आता शक्य होणार आहे. विशेष म्हणजे या चाचणीचा रिपोर्ट 30 मिनिटांत मिळणार आहे. सध्या केल्या जात असलेल्या मॉलिक्युलर (RT-PCR) आणि प्रतिजैवके (Serology) या चाचण्या नागरिकांसाठी वेळखाऊ ठरत आहेत. प्रयोगशाळांवरील ताण तसंच अन्य कारणांमुळे या चाचण्यांचा अहवाल येण्यास काही दिवस जात आहेत. मात्र आता संशोधकांनी सीआरआयएसपीआर (CRISPR) वर आधारित एक टेक्नोलॉजी विकसित केली आहे. यानुसार स्मार्टफोनचा वापर करून कोरोना चाचणी करणं शक्य होणार आहे. हे अनोखं तंत्रज्ञान ग्लॅडस्टोन इन्स्टिट्युटस ( Gladstone Institutes), युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया (University of California), बर्केली (UC Berkeley), सॅन फ्रॅन्सिस्कोतल्या (UCSF) शास्त्रज्ञांनी तयार केलं आहे. याबाबत जर्नल सेल (Journal cell) मध्ये सविस्तर माहिती देण्यात आली आहे. सायटेक डेलीच्या मते (Scitech Daily) ग्लॅडस्टोन इन्स्टिट्युट ऑफ व्हायरोलॉजीच्या अध्यक्षा आणि अभ्यास पथकाच्या प्रमुख मेलानी ओट म्हणाल्या, “कोरोनाच्या अनुषंगाने केवळ चाचण्यांची संख्या वाढवणं हे महत्त्वाचं नसून वेगवान चाचणीचा पर्याय देणं आवश्यक आहे. आम्ही आखणी केलेले तंत्रज्ञान कमी किमतीत चाचणीचा पर्याय आणि कोरोनाच्या वेगात होत असलेल्या प्रसारावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शकते” लेक माझी लाडकी! मुलीचे पाय धुवून तेच दूध प्यायला; लग्नाआधी बापलेकीचा भावुक VIDEO या तंत्रज्ञानाची रचना यूसी बर्केलेचे जैव अभियांत्रिकी, इनोव्हेटिव्ह जीनोमिक्स संस्थेचे अध्यक्ष आणि हॉर्वेड ह्युज मेडीकल इन्स्टीटयुटचे डॅनियल फ्लेचर आणि यूसी बर्केलीमधील प्राध्यापिका आणि ग्लॅडस्टोमधील वरिष्ठ संशोधक जेनिफर डोडोना यांनी केली आहे. डोडोना यांना सीआरआयएसपीआर – कॅस जेनोम एडिटिंग या रसायनशास्त्रातील तंत्र संशोधनासाठी 2020 मध्ये नोबेल पारितोषिकाने सन्मानित करण्यात आलं आहे. याच तंत्राचा वापर या चाचणी संशोधनासाठी केला जाणार आहे. सध्या अस्तित्वात असलेल्या चाचणीद्वारे रुग्ण कोरोनाबाधित आहे किंवा नाही तसंच विषाणूंची संख्या (Viral load) किती आहे हे कळतं. चॅन झुकेरबर्ग बायोहबचे संशोधक डॉ. फ्लेचर म्हणाले की, “विषाणू संख्येसाठी सातत्याने चाचण्या केल्या असता संसर्ग वाढणार की कमी होणार याबाबत अंदाज लावता येतो. पण या येऊ घातलेल्या तंत्रज्ञानातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे आरोग्य अधिकारी रुग्णामधील संसर्गाची तपासणी करू शकणार आहेत. तसंच रुग्णामधील संसर्गाची पातळी, पुढील धोके आणि रुग्णाला बरं होण्यासाठी किती कालावधी लागेल याचा देखील अंदाज बांधू शकणार आहेत” VIDEO VIRAL: 3 वर्षांपूर्वी मालकापासून दुरावला होता कुत्रा; अशी झाली गळाभेट आज सर्व जग कोरोना महासाथीच्या (corona Pandemic) विरोधात लढा देत आहे. जगभरातील लाखो नागरिक कोरोनाबाधित आहेत. वेगात चाचणी प्रक्रिया उपलब्ध नसणं हा कोरोना साथीचा सामना करताना जाणवत असलेला मोठा अडथळा आहे. कोरोनाचा संसर्ग आणि धोका रोखण्यासाठी वेगात चाचणी प्रक्रिया पद्धती उपयुक्त ठरणार असून ती धोरणकर्ते आणि नागरिकांना नक्कीच फायदेशीर ठरेल.
    First published:

    Tags: Corona, Corona virus in india

    पुढील बातम्या