• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • Single dose मध्ये काम तमाम; आता भारतात मिळणार Sputnik light corona vaccine

Single dose मध्ये काम तमाम; आता भारतात मिळणार Sputnik light corona vaccine

डिसेंबरपर्यंत भारतात स्पुतनिक लाइट (Sputnik light) कोरोना लस लाँच केली जाणार आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : भारतात सध्या ज्या कोरोना लशी (Corona vaccine) दिल्या जात आहेत, त्यांचे दोन डोस घ्यावे लागत आहे. या लशींच्या दोन डोसमधील अंतर वेगवेगळं आहे पण दोन्ही डोस घेणं गरजेचं आहे. पण आता लवकरच फक्त एका डोसची कोरोना लस (Single dose corona vaccine) उपलब्ध होणार आहे. डिसेंबरमध्ये भारतात सिंगल डोस कोरोना लस स्पुतनिक लाइट (Sputnik Light) लाँच केली जाणार आहे (Sputnik Light will be launched in india by December). भारतात रशियाने तयार केलेली स्पुतनिक V ही लस सध्या दिली जाते आहे. त्यापाठोपाठ आता रशियाची दुसरी लस स्पुतनिक लाइटही भारतात दिली जाणार आहे. डिसेंबरपर्यंत ही लस भारतात लाँच होणार आहे, अशी माहिती रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंडचे (Russian Direct Investment Fund - RDIF) सीईओ किरील दमित्रिव यांनी सांगितल्याचं वृत्त एएनआयने दिलं आहे. हे वाचा - धक्कादायक! स्वत: पालकच आपल्या मुलांना पाठवत आहेत कोरोना पार्टीत कारण... भारतात हैदराबादच्या डॉ. रेड्डी कंपनीने (Dr Reddy’s Laboratories) RDIF करार केला आहे. त्यानुसार या कंपनीमार्फत स्पुतनिक V लस पुरवली जाते आहे. ही लस  adenovirus vector 26 (Ad26) आणि adenovirus vector 5 या दोन घटकांपासून तयार करण्यात आली आहे. तर स्पुतनिक लाइट या लशीत फक्त Ad26 हा घटक आहे. बुस्टर डोस म्हणूनही ही लस प्रभावी ठरली असल्याची माहिती आरडीआयएफने दिली आहे. हे वाचा - महाराष्ट्रात डिसेंबरमध्ये येणार कोरोनाची तिसरी लाट, आरोग्यमंत्र्यांचा इशारा गेल्या महिन्यात आरडीआयफने दिलेल्या माहितीनुसार स्पुतनिक लाइट लस घेतल्यानंतर पहिल्या तीन महिन्यात ही लस डेल्टा व्हेरिएंटवर 70 टक्के प्रभावी ठरली. 28000 लोकांवर या लशीची चाचणी करण्यात आली. लस न घेतलेल्या 5.6 दशलक्ष लोकांशी त्यांची तुलना करून हा अहवाल सादर करण्यात आला. मॉस्कोमध्ये जुलै 2021 मध्ये हा अभ्यास झाला. 60 पेक्षा कमी वयाच्या लोकांवर ही लस 75 टक्क्यांपेक्षा जास्त प्रभावी असलयाचं दिसून आलं आहे. आजाराची तीव्रता कमी करण्यात ही लस मदत करते. त्यामुळे रुग्णालयात जाण्याची वेळ ओढावत नाही.
  Published by:Priya Lad
  First published: