मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

खोकल्यानंतर किती वेळात आणि कसा पसरतो कोरोना? संशोधनातून समोर आली नवीन माहिती

खोकल्यानंतर किती वेळात आणि कसा पसरतो कोरोना? संशोधनातून समोर आली नवीन माहिती

खोकल्याचा एक थेंब जवळपास 7 मीटरपर्यंत पसरू शकतो. हवेचा वेग जर सेकंदाला 2 मीटरपर्यंत गृहित धरला तर हा खोकल्याचा थेंब 6.6 मीटरपर्यंत प्रवास करतो.

खोकल्याचा एक थेंब जवळपास 7 मीटरपर्यंत पसरू शकतो. हवेचा वेग जर सेकंदाला 2 मीटरपर्यंत गृहित धरला तर हा खोकल्याचा थेंब 6.6 मीटरपर्यंत प्रवास करतो.

खोकल्याचा एक थेंब जवळपास 7 मीटरपर्यंत पसरू शकतो. हवेचा वेग जर सेकंदाला 2 मीटरपर्यंत गृहित धरला तर हा खोकल्याचा थेंब 6.6 मीटरपर्यंत प्रवास करतो.

  • Published by:  Kranti Kanetkar
नवी दिल्ली, 07 नोव्हेंबर : कोरोनाच्या या संकटकाळात नवनवीन संशोधन समोर येत आहे. आता नवीन संशोधन समोर आलं असून यामध्ये खोकल्याचा एक थेंब जवळपास 7 मीटरपर्यंत पसरू शकतो. हवेचा वेग जर सेकंदाला 2 मीटरपर्यंत गृहित धरला तर हा खोकल्याचा थेंब 6.6 मीटरपर्यंत प्रवास करतो. त्याचबरोबर कोरड्या हवेमध्ये देखील वाफेच्या माध्यमातून हा थेंब पसरू शकतात. या संशोधनात सिंगापूरमधील संशोधकांनी व्हायरल ट्रान्समिशन अधिक समजून घेण्यासाठी फ्लुइड फिजिक्सच्या महत्त्वपूर्ण बाबींचा अभ्यास केला. सिंगापूरमधील इन्स्टिट्यूट ऑफ हाय परफॉर्मन्स कंप्युटिंगमधील संशोधकांनी केलेलं हे संशोधन 'Physics of Fluids या जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आलं आहे. यामध्ये high fidelity air flow simulationचा वापर करत थेंबाचा प्रसार कशा पद्धतीने होतो याचा संख्यात्मक अभ्यास करण्यात आला. या संशोधनातील संशोधक फाँग येव लेआँग यांनी याविषयी बोलताना म्हटले, ‘ मास्क घालण्याबरोबरच सोशल डिस्टंन्सिंग प्रभावी ठरत आहे. कारण खोकणाऱ्या माणसापासून जर दुसरी व्यक्ती एक मीटर दूर असेल तर खोकल्यामुळे हवेत उडणारे शिंतोडे तुमच्यापर्यंत पोहोचून संसर्गाचा धोका कमी असतो. खोकल्याच्या एका उबळीतून तोंडावाटे हजारो शिंतोडे बाहेर पडत असतात आणि त्यांचा आकारही वेगवेगळा असतो.या संशोधनात संशोधकांना आढळून आलं, खोकल्याचे मोठे थेंब गुरुत्वाकर्षणामुळे तत्काळ खाली बसतात परंतु काही थेंबांना गती असल्यामुळे वारं वाहत नसतानाही ते १ मीटरपर्यंत हवेत पसरू शकतात. मध्यम आकाराच्या थेंबांचं रुपांतर लहान थेंबांमध्ये होऊन हलके असल्यामुळे हवेतून लांबपर्यंत सहज जाऊ शकतात. या संशोधनात संशोधकांनी थेंबाच्या प्रसाराचं अधिक विस्तृत चित्र समोर मांडलं त्यांनी विषाणूचा बायोलॉजिकल पद्धतीने विचार केला. खोकल्याच्या थेंबातील नॉनव्होलेटाइल भागाचं बाष्पीभवन आणि थेंबांच्या हवेतील प्रवासाविषयी अधिक सविस्तर माहिती दिली आहे. दुसरे अभ्यासक हाँगयिंग ली म्हणाले, ‘बाष्पीभवनात होत असलेल्या थेंबात नॉनव्होलेटाइल व्हायरल कंटेंट तसाच राहतो त्यामुळे विषाणू पसरतो. याचा अर्थ असा की बाष्पीभवन न झालेल्या खोकल्याच्या मोठ्या थेंबापेक्षा बाष्पीभवन झालेल्या थेंबांपासून तयार झालेले एरोसोल्स श्वासावाटे फुफ्फुसांपर्यंत आणि श्वासनलिकेपर्यंत पोहोचून इन्फेक्शन होतं. मोठ्या प्रमाणात थेंब टिकून राहतात त्यामुळे हवेतील प्रसारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होते.’ हे वाचा-प्रदुषणावर आळा घालणं आवश्यक! अधिक प्रदुषित परिसरात कोरोनामुळे मृत्यूही जास्त संशोधकांनी यामध्ये मानवी शरीराभोवती असलेल्या हवेतील खोकल्याचे थेंब आणि हवेचा झोत यांची क्लिष्ट अशी गणिती सूत्र तयार करून त्याची कॉम्प्युटरच्या माध्यमातून उकल करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वाऱ्याचा वेगवेगळा वेग आणि इतर पर्यावरणीय घटकांचा परिणामही गृहित धरण्यात आला होता. ठराविक अंतरावर असलेल्या एखाद्या व्यक्तीवर या थेंबांचा काय परिणाम होतो याचाही अभ्यास त्यांनी केला. यामध्ये निष्कर्ष निघाला कि, थेंबाचा प्रवास हा हवेचा वेग, हवेतील आद्रता, हवेचे तापमान या घटकांवर अवलंबून असतो. त्याचबरोबर कोविड-19 विषाणूच्या जिवंत राहण्यासंबंधी आतापर्यंत झालेल्या शास्रीय अभ्यासाती गृहितकांना अनुसरून हा अभ्यास करण्यात आला. सध्याचा अभ्यास हा बाहेरच्या वातावरणात खोकल्याच्याय थेंबांचा प्रवास या विषयावर करण्यात आला असून त्यातील निष्कर्ष घरातील तसंच जिथं अनेक जणं जमतात अशा ठिकाणी म्हणजे कॉन्फरन्स हॉल किंवा अम्फी थिएटरमधील फैलावाचा अभ्यास करताना वापरण्याचा संशोधकांचा विचार आहे.
First published:

पुढील बातम्या