Corona vaccine घेण्यासाठी नाही इंजेक्शनची गरज; आता आली वेदनाविरहित कोरोना लस

Corona vaccine घेण्यासाठी नाही इंजेक्शनची गरज; आता आली वेदनाविरहित कोरोना लस

आता आणखी देशानं सुईशिवाय लस (Needle free vaccine) तयार केल्याचा दावा केला आहे.

  • Share this:

सिडनी, 21 सप्टेंबर : जगभरातील कोरोनाबाधितांची (Coronavirus) संख्या वाढत असताना, सध्या सर्व देशांचे लक्ष लागले आहे ते कोरोना लशीकडे (Corona vaccine) . तब्बल 70 हूनअधिक देश कोरोना लशीची ट्रायल करत आहेत. रशिया आणि चीन यांनी कोरोनाची लस तयार केल्याचा दावाही केला आहे. यातच आता आणखी देशानं सुईशिवाय लस (Needle free vaccine) तयार केल्याचा दावा केला आहे.

ऑस्ट्रेलियामधील शास्त्रज्ञांनी सुईशिवाय कोरोनाची लस तयार केली आहे. आता या लसीची चाचणी सुरू होईल. ही लस डीएनएवर आधारित आहे आणि त्याच्या चाचणीसाठी 150 लोकांनी त्यांची नावे पाठविली आहेत. सिडनी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी तयार केलेली ही कोरोना लस एअर जेट मशीनद्वारे रुग्णांच्या त्वचेवर टोचली जाईल. हे डिव्हाइस फार्माजेट म्हणून ओळखले जाते. डॉक्टर गिन्नी मॅनसबर्ग यांची टीम ही लस तयार करत आहे. मॅनसबर्ग यांनी दिलेल्या माहितीनुसार, फार्माजेटद्वारे दिलेली लस इंजेक्शनपेक्षा अधिक प्रभावी ठरू शकते.

वाचा-कोरोना आहे की नाही 2 तासांत कळणार, स्वदेशी 'फेलुदा' चाचणीला DCGI ची मान्यता

डेली मेलच्या रिपोर्टनुसार नवीन लस थेट व्यक्तीच्या त्वचेपर्यंत पोहोचते. शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीमध्ये त्वचा महत्वाची भूमिका निभावते. म्हणूनच, त्वचेवर दिलेली लस अधिक प्रभावी ठरू शकते. डॉक्टर गिन्नी मॅनसबर्ग म्हणतात की ही नवीन लस एखाद्या व्यक्तीच्या इम्यून सिस्टमवर डीएनएचा एक छोटा तुकडा ओळखून स्वतःचे अॅंटिजन तयार करेल या कल्पनेवर आधारित आहे.

वाचा-COVID-19: ब्रिटन नंतर आता युरोपातल्या या मोठ्या देशातही कोरोनाची दुसरी लाट

दरम्यान, एअर जेट सिस्टममुळे वेदना होतच नाही असे नाही. मात्र यामुळे सुई लावल्यानंतर त्वचेवर होणारी इजा कमी होऊ शकते. काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया सरकारने ही लस विकसित करण्यासाठी 30 लाख डॉलर्सचा निधी जाहीर केला.

वाचा-106 वर्षांच्या आजीपुढे हरला कोरोना, डिस्‍चार्ज मिळताच चेहऱ्यावर फुललं असं हसू

भारताने तयार केली पहिली FELUDA CORONA TEST

सध्या कोरोनाव्हायरसचं निदान करण्यासाठी आरटी-पीसीआर टेस्ट केली जाते. या टेस्टचा रिपोर्ट येण्यासाठी वेळही जास्त लागतो, शिवाय खर्चही जास्त आहे. मात्र आता आरटी-पीसीआरइतकीच परिणामकारक मात्र त्यापेक्षा कमी खर्चिक आणि कमी वेळेत रिपोर्ट देणारी टेस्ट आता भारतात विकसित करण्यात आली आहे. टाटा ग्रुप आणि सीएसआयआर इन्स्टिट्युट ऑफ जेनॉमिक्स अँड इन्टिग्रेटिव्ह बायोलॉजीने (CSIR-IGIB) एकत्रितरित्या कोरोना टेस्ट तयार केली आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: September 21, 2020, 3:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading