मथुरा, 13 ऑगस्ट : राम जन्मभूमी ट्रस्टचे अध्यक्ष (Shriram Janambhumi Teerth Kshetra Trust) महंत नित्य गोपाळ दास (Mahant Nritya Gopal Das) यांची अचानक प्रकृती खालवल्याची माहिती मिळाली आहे. जन्माष्टमीनिमित्तानं मथुरा इथे ते कार्यक्रमासाठी आले असताना अचानक त्यांना त्रास होऊ लागला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार श्वसनाचा त्रास झाल्यानं त्यांना तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं.
महंत नित्य गोपाळ दास यांच्या प्रकृी नाजूक असल्याची माहिती डॉक्टरांच्या टीमनं दिली आहे. त्यांची चाचणी करण्यात आली असून त्यांचा कोरोनाचा अहवाला पॉझिटिव्ह आला आहे. राम मंदिराच्या भूमिपूजन सोहळ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत भूमिपूजनासाठी महंत नित्य गोपाळ दासही उपस्थित होते. 7 दिवसांनंतर आता त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे.
CM has taken details of the health status on Mahant Nitya Gopaldas (in file pic) who has tested COVID19 positive. He has spoken to DM Mathura and to Dr Trehan of Medanta and requested for immediate medical attention for him at the hospital: Chief Ministers' Office pic.twitter.com/w3T8LN9Afz
दरवर्षीप्रमाणे महंत नित्य गोपाळ दास जन्माष्टमीनिमित्तानं मथुरेत आले होते. सोहळ्यादरम्यान त्यांना अचानक श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागला. त्यांनी तातडीनं डॉक्टरांना बोलवण्यास सांगितलं. प्रकृती बिघडल्यानंतर तातडीनं सीताराम आश्रमात दाखल करण्यात आलं. तिथे कोरोनाची चाचणी करणारी टीमही पोहोचली. महंत नृत्य गोपाळ दास यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती मिळाली आहे.