मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

अमेरिकेत डेल्टा व्हायरसचा प्रकोप; बेड, स्टाफ आणि ऑक्सिजनची कमतरता

अमेरिकेत डेल्टा व्हायरसचा प्रकोप; बेड, स्टाफ आणि ऑक्सिजनची कमतरता

अमेरिकेत (America) कोरोनाच्या (Corona) नव्या डेल्टा व्हायरसचा (Delta Virus) प्रकोप झाला असून त्याचा सामना करण्यासाठी देशातील यंत्रणा कमी पडत असल्याचं चित्र आहे.

अमेरिकेत (America) कोरोनाच्या (Corona) नव्या डेल्टा व्हायरसचा (Delta Virus) प्रकोप झाला असून त्याचा सामना करण्यासाठी देशातील यंत्रणा कमी पडत असल्याचं चित्र आहे.

अमेरिकेत (America) कोरोनाच्या (Corona) नव्या डेल्टा व्हायरसचा (Delta Virus) प्रकोप झाला असून त्याचा सामना करण्यासाठी देशातील यंत्रणा कमी पडत असल्याचं चित्र आहे.

  • Published by:  desk news

न्यूयॉर्क, 31 ऑगस्ट : अमेरिकेत (America) कोरोनाच्या (Corona) नव्या डेल्टा व्हायरसचा (Delta Virus) प्रकोप झाला असून त्याचा सामना करण्यासाठी देशातील यंत्रणा कमी पडत असल्याचं चित्र आहे. अमेरिकेत डेल्टा व्हेरिअंटने संक्रमित होणाऱ्या रुग्णांची (Patients) संख्या झपाट्याने वाढत असून त्यांना सामावून घेऊन उपचार करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा कमी पडत असल्याचं चित्र आहे. ऑक्सिजन बेड (Oxygen Bed) आणि हॉस्पिटल स्टाफ (Hospital Staff) यांची कमालीची कमतरता जाणवत असून सामान्य रुग्णांचे हाल व्हायला सुरुवात झाली आहे.

ऑक्सिजनची कमतरता

अमेरिकेतील फ्लोरिडा, दक्षिण कॅरोलिना, टेक्सास, लुसियाना यासारख्या राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून त्यांच्यासाठी ऑक्सिजन बेड कमी पडत असल्याचं चित्र आहे. डेल्टा व्हायरसचा शिरकाव तरुणांना होण्याचं प्रमाण वाढलं आहे. सीएनएन वाहिनीशी बोलताना डॉ. अस्थर चू यांनी लहान मुलांना डेल्टा व्हेरियंटची लागण होण्याची शक्यता अधिक असल्याची भीती व्यक्त केली आहे. लहान मुले हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचं प्रमाण भविष्यात वाढू शकतं, असं त्यांनी म्हटलं आहे. अमेरिकेत शाळा सुरु झाल्या आहेत. त्यामुळे डेल्टा व्हेरियंटचा प्रभाव लहान मुलांवरही जाणवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

डिसेंबरपर्यंत 1 लाख मृत्यू

अमेरिकेत सध्याच्या कोरोनाचा कहर असाच सुरु राहिला तर डिसेंबरपर्यंत मृत्यूंचा आकडा 1 लाखांच्या घरात जाण्याची शक्यता असल्याचं एका अभ्यासात नमूद करण्यात आलं आहे. योग्य खबरदारी घेतली तर ही लाट लवकर आटोक्यात येऊ शकते. मात्र सध्या डेल्टा व्हेरियंटमुळे मृत्यूचं प्रमाण वाढण्याची शक्यता असून अमेरिकेतील काही भागातील मृत्यूदर हा तब्बल 50 टक्क्यांपर्यंत वाढला आहे.

हे वाचा - अमेरिकेच्या माघारीनंतर तालिबानकडून विमानतळावर अंदाधुंद गोळीबार आणि आतषबाजी

नवा व्हायरस 1 हजारपट घातक

कोरोनाच्या मूळच्या व्हायरसच्या तुलनेत सध्याच्या डेल्टा व्हायरस हा 1 हजार पट अधिक घातक असल्याचं चीनमधील संशोधनातून समोर आलं आहे. जेव्हा डेल्टा व्हायरस रुग्णाला बाधित करतो, तेव्हा त्याच्या नाकात जुन्या व्हायरसच्या तुलनेत 1000 पट अधिक व्हायरस असतात, असं निरीक्षण चीनमधील प्रयोगातून समोर आलं आहे.

First published:

Tags: America, Coronavirus