मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /धक्कादायक! Corona Vaccine घेतल्याच्या 10 दिवसांनंतर स्वयंसेवकाचा मृत्यू; भारत बायोटेककडून स्पष्टीकरण

धक्कादायक! Corona Vaccine घेतल्याच्या 10 दिवसांनंतर स्वयंसेवकाचा मृत्यू; भारत बायोटेककडून स्पष्टीकरण

भारत बायोटेक तयार करत असलेल्या कोरोनाच्या लसीकरणाच्या (Corona Vaccine) प्रयोगात सहभागी असलेल्या स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे

भारत बायोटेक तयार करत असलेल्या कोरोनाच्या लसीकरणाच्या (Corona Vaccine) प्रयोगात सहभागी असलेल्या स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे

भारत बायोटेक तयार करत असलेल्या कोरोनाच्या लसीकरणाच्या (Corona Vaccine) प्रयोगात सहभागी असलेल्या स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे

हैदराबाद, 9 जानेवारी : भारत बायोटेक तयार करत असलेल्या कोरोनाच्या लसीकरणाच्या (Corona Vaccine) प्रयोगात सहभागी असलेल्या स्वयंसेवकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना भोपाळमध्ये घडली आहे. लशीच्या तिसऱ्या टप्प्यात हा स्वयंसेवक यात सहभागी झाला होता. लशीच्या ट्रायलच्या आधी स्वयंसेवकाला सर्व नियम आणि अटींची माहिती देण्यात आली होती, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. इतकंच नाही तर लस घेतल्यानंतर सात दिवस हा स्वयंसेवक निरीक्षणाखाली होता, मात्र त्या काळात कोणतीही प्रतिकूल लक्षणे आढळली नसल्याचेही कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे. (Volunteer death 10 days after taking Corona Vaccine)

भारत बायोटेकच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यात ट्रायल घेण्यात येणारा हा स्वयंसेवक सर्व नियमांचे योग्य पालन करीत होता. ट्रायल करण्यापूर्वी या स्वयंसेवकाची प्रकृतीही उत्तम होती. या स्वयंसेवकाला कोरोना लशीचा डोस देण्यात आल्यानंतर, त्याच्या प्रकृतीबाबत सतर्कता बाळत, निरीक्षणाखाली ठेवण्यात आले होते. डोस दिल्यानंतर सात दिवसांनी जेव्हा त्याची आरोग्य तपासणी करण्यात आली, त्यावेळी कोणतीही प्रतिकूल लक्षणे जाणवली नाहीत. असे स्पष्टीकरण कंपनीने दिले आहे.

हे ही वाचा-अवैध संबंधात हत्येचं गूढ; काकीनेच नोकराच्या मदतीने पुतण्याच्या हत्येचा रचला कट

10 दिवसांनंतर स्वयंसेवकाचा मृत्यू

12 डिसेंबरला कोरोना लशीच्या चाचणीदरम्यान लस घेणाऱ्या स्वयंसेवकाचा दहा दिवसांनी मृत्यू झाला आहे. शुक्रवारी मृत व्यक्तीच्या मुलाने ही माहिती दिली. यानंतर चाचणी घेण्यात येत असलेल्या रुग्णालयात गोंधळ उडाला.  (Volunteer death 10 days after taking Corona Vaccine) मृत स्वयंसेवकाच्या पोस्टमार्टेम अहवालात शरीरात विष मिळाल्याचे समोर आले आहे. तर मृत व्यक्तीच्या मृत्यूचा लसीकरणाशी कोणताही संबंध नसल्याचे चाचणी केंद्राकडून सांगण्यात येत आहे.

या स्वयंसेवकाला लस देण्यात आली होती की प्लेसिबो याचेही उत्तर अद्याप गुलदसत्त्यातच आहे. लस दिल्यानंतर कोणत्याही व्यक्तीवर काय मानसिक परिणाम होतो, हे जाणून घेण्यासाठी लस देण्यापूर्वी प्लेसिबोचा उपयोग करण्यात येतो.  (Volunteer death 10 days after taking Corona Vaccine) प्लेसिबो हे औषध नसून, त्याचे कोणतेही दुष्परिणामही होत नाहीत. कोरोना लशीच्या तिसऱ्या टप्प्यात करण्यात येत असलेल्या चाचण्यांमध्ये 50 टक्के स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे तर 50 टक्के जणांना प्लेसिबो देण्यात आले आहे.

First published:

Tags: Corona vaccine