Home /News /coronavirus-latest-news /

Corona Death in MP: सरकारने दिलेली मृत्यूची आकडेवारी फसवी? भीषण वास्तव मांडणारा PHOTO

Corona Death in MP: सरकारने दिलेली मृत्यूची आकडेवारी फसवी? भीषण वास्तव मांडणारा PHOTO

भोपाळच्या भदभदा विश्राम घाट येथे 40 चिता जळताना दिसत आहेत. प्रशासनानं मात्र गुरुवारी कोरोनामुळं केवळ 4 मृत्यू झाल्याचं म्हटलंय.

    भोपाळ, 16 एप्रिल : कोरोनाच्या रुग्णांची संख्या देशभरात झपाट्यानं वाढू लागली आहे. मध्यप्रदेशमध्येही गेल्या काही दिवसांत कोरोनाचे (Corona) रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळत आहेत. त्यात व्हायरल होणाऱ्या एका फोटोवरून भोपाळमधली धक्कादायक अशी स्थिती समोर येत आहे. भोपाळच्या भदभदा विश्राम घाट येथे 40 चिता (around 40 dead bodies burning in crematorium) जळताना दिसत आहेत. प्रशासनानं मात्र गुरुवारी कोरोनामुळं केवळ 4 मृत्यू झाल्याचं म्हटलं आहे. प्रसिद्ध केलेला हा फोटो ड्रोनच्या माध्यमातून घेतलेला आहे. दैनिक भास्करनं याबाबत वृत्त दिलं आहे. भोपाळमध्ये सरकारचे आकडे आणि प्रत्यक्ष समोर येणारे आकडे यांच्यात मोठी तफावत असल्याचा दावा या मीडिया अहवालात करण्यात आलेला आहे. प्रशासनानं कोरोनाची लागण होणाऱ्या रुग्णांचे आकडे लपवले आणि आता मृत्यूची आकडेवारीही लपवत असल्याचंही यात म्हटलं आहे. मीडिया अहवालानुसार कोव्हिड प्रोटोकॉलनुसार अंत्यसंस्कार केले जात असूनही आकडे वेगळे येत आहेत. प्रत्यक्ष आकडा आणि प्रशासनाची आकडेवारी यात मोठी तफावत असली तरी या फोटोमधून समोर येणारं वास्तव हे अत्यंत भयाण आणि काळीज चिरणारं असं आहे. विशेष म्हणजे यासंबंधीचा एक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. (हे वाचा - Real Hero: कोरोना रुग्णांसाठी पुन्हा एकदा धावून आला Sonu Sood, 10 ऑक्सिजन जनरेटर) देशातील काही राज्यांमध्ये गेल्या आठवडाभरात स्थिती अचानक गंभीर होत असल्याचं पाहायला मिळत आहे. मध्य प्रदेश बरोबरच, उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि गुजरात या राज्यांचाही याच समावेश आहे. काही दिवसांपूर्वी गुजरातमधील स्मशानभूमीतील देखील एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला होता. तर दोन दिवसांपूर्वीच लखनऊमध्ये एका स्मशानातील मृतदेहांच्या रांगांचं चित्र समोर आलं होतं. देशभरात कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेचा प्रकोप आता पाहायला मिळत आहे (हे वाचा -PPE कीट घालून विश्रांती घेणाऱ्या नर्सचा फोटो व्हायरल, वाचा भावुक करणारी कथा ) कोरोनाचा संसर्ग प्रचंड वेगानं या काही राज्यांमध्ये पसरताना दिसत आहे, कारण अचानक येथील रुग्णांमध्ये मोठी वाढ होऊ लागलीय. मृतांचे किंवा रुग्णांचे खरे आकडे कोणते हा विषय तर महत्त्वाचा आहेच. मृतांच्या कुटुंबीयांचं नुकसान कशानेही भरून न निघणारं आहे. पण सध्याच्या या घडीला लवकरात लवकर गरजुंना उपचार उपलब्ध करून देणं आणि रुग्णांचे जीव वाचवणं सर्वाधिक गरजेचं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Bhopal News, Coronavirus, Madhya pradesh

    पुढील बातम्या