• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • धक्कादायक! जी कंपनी ऑक्सिजनच तयार करत नाही त्यांना दिलं पुरवठ्याचं काँट्रॅक्ट, BMC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह

धक्कादायक! जी कंपनी ऑक्सिजनच तयार करत नाही त्यांना दिलं पुरवठ्याचं काँट्रॅक्ट, BMC च्या कारभारावर प्रश्नचिन्ह

Oxygen Shortage in Mumbai: मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्याची परिस्थिती आहे. अशावेळी समोर आलेली ही बातमी धक्कादायक आहे. जे ऑक्सिजनचं उत्पादन करत नाही त्यांना कंत्राट कसं देण्यात आलं असा सवाल उपस्थित केला जात आहे

  • Share this:
मुंबई, 17 एप्रिल: संचारबंदीचा आणि लॉकडाऊनचा (Lockdown in Maharashtra) सामना करणाऱ्या महाराष्ट्रासाठी ऑक्सिजन (Shortage of Oxygen), रेमडिसिव्हिरचा तुटवडा या समस्या दुहेरी मारा करणाऱ्या ठरत आहे. आर्थिक घडामोडींचं केंद्र असणाऱ्या मुंबईतही परिस्थिती वेगळी नाही आहे. मुंबईतील अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनच्या तुटवड्याची परिस्थिती आहे. मुंबईच्या गोवंडी याठिकाणी असणारं शताब्दी रुग्णालय, बोरीवलीतील भगवती रुग्णालयात, बांद्रामधील भाभा रुग्णालय, कुर्ल्यामधील भाभा रुग्णालय त्याचप्रमाणे मुलुंड याठिकाणी असणारं एम टी अगरवाल या रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा बाधित झाला आहे. मुंबईतील या महत्त्वाच्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा असल्यामुळे याठिकाणी असणाऱ्या रुग्णांना दुसरीकडे हलवलं जात आहे. अशी परिस्थिती असताना या रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराने ऑक्सिजन पुरवठ्याबाबत आपली असमर्थता दर्शवली आहे. त्यांच्याकडून अशी माहिती देण्यात आली आहे की ऑक्सिजनचा पुरवठा करत येणार नाही. (हे वाचा-तोंड कोरडं पडतंय? तर असू शकतो कोरोना; 50 टक्के लोकांमध्ये आढळली 'ही' नवी लक्षणं) धक्कादायक बाब म्हणजे पालिकेला ऑक्सिजनचा पुरवठा करणारा सतरामदास मेसर्स ही कंत्राटदार कंपनी ऑक्सिजनचं उत्पादन करत नाही. हा कंत्राटदार इतर 2 कंपन्यांकडून ऑक्सिजन खरेदी करून मग पालिकेला देतो. पालिकेच्या बहुतांश सगळ्या रुग्णालयांना ऑक्सिजनचा  सतरामदास मेसर्स याच कंपनीकडून केलं जातं. मात्र ज्या दोन कंपन्यांकडून सतरामदास मेसर्स कंपनीला ऑक्सिजनचा पुरवठा होतो, त्यांच्याकडून पुरवठा होत नसल्याचं या कंपनीचं म्हणणं असल्याची, अशी सूत्रांची माहिती आहे. अशावेळी असा सवाल उपस्थित होतो आहे की जी कंपनी ऑक्सिजनचं उत्पादनच करत नाही, त्यांना ऑक्सिजन पुरवठा करण्याचं कंत्राट कसं काय देण्यात आलं? कशाचा आधारे या कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं असा प्रश्न विचारला जात आहे. अनेक रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचे रिकामे सिलेंडर मुंबई महानगरपालिकेच्या बोरीवलीतील भगवती रुग्णालयात ऑक्सिजनचे रिकामे सिलेंडरच बघायला मिळत आहेत. इथला ऑक्सिजनचा पुरवठा थांबल्यानं रूग्णांना इतरत्र हलवण्यात आलं. शुक्रवारी दुपारपासूनच जेव्हा ऑक्सिजनचा पुरवठा  बंद झाल. तेव्हापासून जवळपास दुपारी पंधरा आणि त्यानंतर रात्री उशिरा 27 अशा रुग्णांना वेगवेगळ्या रुग्णालयात पाठवण्यात आल.  पैकी ICU मध्ये असलेल्या 6 जणांना कांदरपाडा जंबो सेन्टर,  तर ऑक्सिजनवर असलेल्या 23 जणांना दहिसर कोव्हिड जंबो सेन्टर, 11 जणांना शताब्दी रुग्णालय तर 2 जणांना खाजगी रुग्णालयात पाठवण्यात आलं. आताही एकूण 49 जण इथे उपचार घेत आहेत. पण आजही ऑक्सिजनचा पुरवठा नाही झाला तर मात्र इथून सगळ्याना हलवलं जाऊ शकतं. (हे वाचा-मुंबई संपूर्ण लॉकडाऊनच्या दिशेने! कोरोना स्थिती पाहाता महापौरांनी दिले संकेत) मुलुंड याठिकाणी असणाऱ्या Covid केअर सेंटरमध्ये शुक्रवारी एकाच दिवशी 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून ऑक्सिजन आणि ICU च्या कमतरतेमुळे हे मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.  बांद्रा पश्चिमेत असलेल्या भाभा रुग्णालयात काल मध्यरात्री ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे 33 रुग्णांना बीकेसीच्या जम्बो सेंटर आणि इतर सेंटर मध्ये हलवण्यात आलं आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published: