मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

भय संपत नाही! चीनच्या शांघायमध्ये सर्वात मोठं Lockdown, माणसांसह प्राण्यांच्याही फिरण्यावर बंदी

भय संपत नाही! चीनच्या शांघायमध्ये सर्वात मोठं Lockdown, माणसांसह प्राण्यांच्याही फिरण्यावर बंदी

China Coronavirus News: शांघाय, चीनची आर्थिक राजधानी आणि 2.6 कोटी लोकसंख्या असलेलं सर्वात मोठं शहर आहे. यापूर्वी कोविडचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर मर्यादित लॉकडाउन लागू केलं होतं, ज्यामध्ये निवासी संकुलं आणि कामाची ठिकाणं बंद ठेवली होती.

China Coronavirus News: शांघाय, चीनची आर्थिक राजधानी आणि 2.6 कोटी लोकसंख्या असलेलं सर्वात मोठं शहर आहे. यापूर्वी कोविडचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर मर्यादित लॉकडाउन लागू केलं होतं, ज्यामध्ये निवासी संकुलं आणि कामाची ठिकाणं बंद ठेवली होती.

China Coronavirus News: शांघाय, चीनची आर्थिक राजधानी आणि 2.6 कोटी लोकसंख्या असलेलं सर्वात मोठं शहर आहे. यापूर्वी कोविडचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर मर्यादित लॉकडाउन लागू केलं होतं, ज्यामध्ये निवासी संकुलं आणि कामाची ठिकाणं बंद ठेवली होती.

पुढे वाचा ...
  • Published by:  Digital Desk

बीजिंग, 29 मार्च : चीनमध्ये कोरोनाबाधित रुग्ण (corona positive patients in china) झपाट्यानं वाढत आहेत. शांघायमध्ये (corona in shanghai) रहिवाशांना घराबाहेर पडण्यास बंदी घातली आहे. शहराच्या पूर्वेकडील भागात राहणाऱ्या लोकांसाठी लॉकडाउन निर्बंध आणखी कडक केले आहेत. त्यांच्या पाळीव कुत्र्यांनाही फिरण्यास मनाई केली आहे. शहरातील दररोजचे कोविड रुग्ण मंगळवारी विक्रमी 4,477 वर पोहोचल्यानंतर स्थानिक प्रशासनानं हे पाऊल (china corona update) उचललंय.

पुडोंग जिल्ह्यातील सर्व रहिवासी, अनेक उच्चभ्रू वित्तीय संस्था आणि शांघाय स्टॉक एक्सचेंजची कार्यालयं येथील लोक कार्यांमध्येच राहतील आणि त्यांना केवळ कोविड चाचणीसाठीच बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल. निवासी संकुलात राहणाऱ्या लोकांच्या निवेदनाच्या आधारे ब्लूमबर्ग न्यूजनं ही माहिती दिली आहे.

शांघाय म्युनिसिपल हेल्थ कमिशनचे अधिकारी वू कियान्यु यांनी मंगळवारी सांगितलं की, संसर्गाचा धोका कमी करण्यासाठी रहिवाशांनी कॉरिडॉर, गॅरेज किंवा त्यांच्या निवासी परिसराच्या मोकळ्या भागात फिरू नये. हे निर्बंध पाळीव प्राण्यांसाठीही आहेत.

शांघायमध्ये दोन वर्षांतील सर्वात मोठा लॉकडाऊन

चीनमधील शांघायमध्ये कोविड-19 चे रुग्ण शोधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर तपासणी करण्यासाठी सोमवारी दोन वर्षांतील सर्वात मोठा लॉकडाऊन सुरू झाला. शांघाय, चीनची आर्थिक राजधानी आणि 2.6 कोटी लोकसंख्या असलेलं सर्वात मोठं शहर आहे. यापूर्वी कोविडचे रुग्ण सापडण्यास सुरुवात झाल्यानंतर मर्यादित लॉकडाउन लागू केलं होतं, ज्यामध्ये निवासी संकुलं आणि कामाची ठिकाणं बंद ठेवली होती.

शांघायमधील वुहान नंतरचं सर्वात मोठं लॉकडाऊन

शहरव्यापी लॉकडाऊन दोन टप्प्यात लागू केलं जाईल आणि हे वुहान नंतरचं सर्वात मोठं लॉकडाऊन असेल. 2019 च्या अखेरीस वुहानमध्येच कोरोना विषाणूचे पहिले रुग्ण आढळून आले आणि तिथं 76 दिवस लॉकडाऊन करण्यात आलं. स्थानिक सरकारच्या म्हणण्यानुसार, शांघायचं आर्थिक केंद्र पुडोंग जिल्हा आणि त्याच्या आजूबाजूचं क्षेत्र सोमवार ते शुक्रवार पहाटे बंद राहतील आणि शहरव्यापी कोविड -19 तपासणी केली जाईल.

हे वाचा - शांततेसाठी युक्रेनला गेलेल्या रशियन अब्जाधीशावर केमिकल Attack

शांघाय डिस्ने पार्क आणि टेस्ला प्लांट बंद

लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात, हुआंगपू नदीच्या पश्चिमेकडील भागात शुक्रवारपासून पाच दिवसांचा लॉकडाऊन असणार आहे. स्थानिक लोकांना घरातच थांबावं लागणार आहे. कार्यालयं आणि व्यावसायिक आस्थापनं बंद राहतील आणि सार्वजनिक वाहतूक सेवा देखील थांबवल्या जातील. शहरात यापूर्वीच अनेक उपक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. शांघाय डिस्ने पार्क देखील बंद करण्यात आला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ऑटोमेकर टेस्लाने आपल्या शांघाय प्लांटमध्ये उत्पादन बंद केलंय.

हे वाचा - रशियानं उद्ध्वस्त केलं शहर, हसता- खेळत्या शहरातल्या 5 हजार लोकांचा मृत्यू

या महिन्यात चीनमध्ये 56,000 हून अधिक कोरोना संसर्गाचे रुग्ण नोंदवले गेले. त्यापैकी बहुतेक जिलिनमध्ये नोंदवले गेले आहेत. जिलिननं चांगचुनसह अनेक शहरांमध्ये प्रवासी निर्बंध आणि आंशिक लॉकडाउन लादलं आहे. चीननं या जागतिक साथीच्या विरोधात 'शून्य सहनशीलता' (Zero Tolerance) धोरण अवलंबले आहे. यामुळं प्रकरणं वाढतात तेव्हा बहुतेक आर्थिक क्रियाकलाप विस्कळीत होतात. चीनमध्ये 87 टक्के लोकसंख्येला कोविड-19 लसीकरण करण्यात आलं आहे.

First published:

Tags: Corona, Corona updates, Coronavirus