मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /Bharat Biotech च्या लशीला तिसऱ्या ट्रायल अगोदरच मंजुरी, कॉंग्रेस खासदाराने सरकारला मागितलं स्पष्टीकरण

Bharat Biotech च्या लशीला तिसऱ्या ट्रायल अगोदरच मंजुरी, कॉंग्रेस खासदाराने सरकारला मागितलं स्पष्टीकरण

Covid Vaccination: कोरोनाला लवकरात लवकर अटकाव केलाच पाहिजे. मात्र त्यासाठी संपूर्ण चाचणीआधीच (Premature) लशीला मंजूरी देणं अयोग्य असल्याचे मतप्रवाह भारतात उमटत आहेत.  काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीच हे आक्षेप घेतले आहेत.

Covid Vaccination: कोरोनाला लवकरात लवकर अटकाव केलाच पाहिजे. मात्र त्यासाठी संपूर्ण चाचणीआधीच (Premature) लशीला मंजूरी देणं अयोग्य असल्याचे मतप्रवाह भारतात उमटत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीच हे आक्षेप घेतले आहेत.

Covid Vaccination: कोरोनाला लवकरात लवकर अटकाव केलाच पाहिजे. मात्र त्यासाठी संपूर्ण चाचणीआधीच (Premature) लशीला मंजूरी देणं अयोग्य असल्याचे मतप्रवाह भारतात उमटत आहेत. काँग्रेस खासदार शशी थरूर यांनीच हे आक्षेप घेतले आहेत.

 नवी दिल्ली, 3 जानेवारी : कोरोनाला (corona) रोखण्यासाठी शक्य तितक्या लवकर लस शोधून तिच्या यशस्वी चाचण्या करत जनसामान्यांपर्यंत पोचवण्याचे प्रयत्न जगभरात सुरू आहेत. भारतही याला अपवाद नाही. मात्र भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) लशीला आता भारतीय नेत्यांच्याच आक्षेपांना समोरं जावं लागत आहे.  काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी (senior congress leaders) भारत बायोटेकच्या लसीला मर्यादित वापरासाठी मंजुरी दिल्याप्रकरणी भारताच्या ड्रग रेग्युलेटर DCGI वर आक्षेप घेतला आहे. या नेत्यांनी भारत सरकारला (Government of India) सक्तीची नियमावली आणि माहितीची पडताळणी या प्रक्रियेतून लसीला मुक्त केल्याप्रकरणी जाब विचारला. भारताचे ड्रग रेग्युलेटर प्राधिकरण DCGI नं रविवारी ऑक्सफर्ड ऍस्ट्राझेन्काची कोविड लस कोविशील्ड आणि भारत बायोटेकची कोवॅक्सिन यांना आणीबाणीच्या वापरासाठी मंजुरी दिली.

तिरुअनंतपुरमचे खासदार शशी थरूर म्हणाले, की ही मंजुरी प्रीमॅच्युअर आहे. कारण भारत बायोटेकनं आजून तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या नाहीत. त्यामुळे या चाचण्या यशस्वी होईपर्यंत वापर न करणे हेच योग्य आहे. 'कोवॅक्सिनच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या अजून बाकी आहेत. ही मंजूरी प्रीमॅच्युअर आहे. आणि यातून धोका उद्भवू शकतो. डॉ. हर्षवर्धन यांनी कृपया स्पष्टीकरण द्यावं. सगळ्या चाचण्यांचा टप्पा पूर्ण होईपर्यंत या लसीचा वापर टाळला पाहिजे. दरम्यान भारत ऍस्ट्राझेन्काचा वापर सुरू ठेऊ शकतो.' असं ट्विट त्यांनी केलं आहे.

गृह खात्याच्या संसदीय समितीचे प्रमुख असलेले ज्येष्ठ नेते आनंद शर्मा यांनीही हा निर्णय अतिशय काळजीपूर्वक घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. कुठल्याच देशानं तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या यशस्वी झाल्याशिवाय वापर सुरू केल्या नसल्याच्या वस्तुस्थितीकडंही त्यांनी लक्ष वेधलं. या चाचण्या पूर्ण झाल्या नसल्याने साहजिकच लशीची सुरक्षितता आणि प्रभाव याबाबतचा पुरेसा डाटा अजून हाती आलेला नाही असंही ते म्हणाले.

भारताच्या केंद्रीय ड्रग ऑथॉरिटीच्या समितीनं शनिवारी भारत बायोटेकनं बनवलेल्या भारतीय बनावटीच्या कोवॅक्सिनला मर्यादित वापरासाठी मंजुरी देण्याची शिफारस केली. ही शिफारस या समितीनं सीरम इन्स्टिट्यूटला ऑक्सफर्ड ऍस्ट्राझेन्काच्या कोविशील्ड लसीच्या आणीबाणी वापरवाबाबत अधिकारपत्र दिल्याच्या दुसऱ्या दिवशी केली. यातून भारतात 2 लसींच्या वापराचा मार्ग मोकळा झालाय. अजून दोन लसी निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहेत.

अजून एक काँगेस नेते जयराम रमेश यांनीही याप्रकरणी काळजी व्यक्त करत केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांना याबाबत स्पष्टीकरण मागितलं आहे. जयराम रमेश यांनीही याबाबत ट्विट केलं आहे.

या मुद्द्याला आधी संसदीय स्थायी समितीनं गृह खात्याच्या पातळीवर दीर्घ चर्चा करत नीट हाताळलं होतं. या समितीनं शासनाला अशी शिफारस केली होती, की कुठल्याही लशीच्या पुरेशा नमुन्यांची यशस्वी चाचणी झाल्यानंतरच तिला आणीबाणीच्या तत्वावर मंजुरी दिली जावी. याबाबत समितीनं 21 डिसेंबरला राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती वेन्कय्या नायडू यांना अहवालही दिला होता. यात समितीनं हे स्पष्ट केलं होतं, की याआधी CDSCO नं कधीही आणीबाणी तत्वावर मंजुरी दिलेली नाही. सगळ्या चाचण्यांचे आवश्यक टप्पे आणि इतर संबंधित बाबी नीटपणे पूर्ण आणि यशस्वी झाल्यावरच लसीला मंजुरी दिली जावी असंही अहवालात म्हंटलेलं होतं.

First published:
top videos

    Tags: Congress, Corona vaccine, Coronavirus, Shashi tharoor