नवी दिल्ली 19 मार्च : मार्च महिन्याच्या पहिल्या सतरा दिवसांमध्ये 1,87,55,540 लोकांना कोरोनाची लस (Corona Vaccine) देण्यात आली आहे. लसीकरणाचा वेग असाच राहिला तर भारतातील (Corona Vaccination In India) सत्तर टक्के लोकसंख्येला लस देण्यास तब्बल 2.36 वर्षाचा वेळ लागेल. सर्वाधिक लोकसंख्या असलेला जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या भारतात 18 मार्च 2021 पर्यंत 3.06 लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. भारताच्या एकूण लोकसंख्येच्या म्हणजेच 135.5 कोटीच्या तुलनेत हे प्रमाण केवळ 2.3 टक्के आहे. तर, दुसरीकडे दोन्ही डोस घेणाऱ्यांची संख्या तर केवळ 0.5 टक्के आहे. याच वेगानं लसीकरण सुरू राहिल्यास देशातील सत्तर टक्के लोकांना दोन्ही डोस देण्यास 10.8 वर्ष लागतील.
आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, 17 मार्चपर्यंत भारतात 1,87,55,540 जणांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. या आकड्यानुसार दररोज 11,03,267.1 लोकांना लसीचा पहिला डोस दिला जात आहे. या आकड्यानुसार भारताला 70 टक्के लोकसंख्येला पहिला डोस देण्यात 2.36 तर संपूर्ण लोकसंख्येला 3.4 वर्ष लागतील.
कोरोना लसीकरणाच्या दुसऱ्या डोसच्या प्रक्रियेत काही प्रमाणात वेग पाहायला मिळत आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या सतरा दिवसांमध्ये 40,86,218 लोकांना लस दिली गेली आहे. म्हणजेच प्रत्येक दिवसाची आकडेवारी काढायची झाल्यास ती 2,40,365.8 इतकी आहे.
लसीकरणाच्या प्रक्रियेला वेग न आल्यास भारतातील 70 टक्के जनतेला दोन्ही डोस 10.8 द्यायला वर्ष आणि सगळ्या लोकसंख्येला दोन्ही डोस द्यायला 15.4 वर्ष लागतील. 1 मार्चला 1,18,45,217 लोकांना लसीचा पहिला डोस दिला गेला. तर, 24,56,250 जणांना दुसरा डोस देण्यात आला. 12 मार्चबद्दल बोलायचं झाल्यास यादिवशी 3,06,00,787 जणांना पहिला डोस तर 65,42,468 जणांना दुसरा डोस देण्यात आला. मागील सतरा दिवसांमध्ये 1,87,55,540 लोकांनी कोरोना लसीचा पहिला डोस घेतला. तर, 40,86,218 जणांनी दुसरा डोस घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.