• Home
  • »
  • News
  • »
  • coronavirus-latest-news
  • »
  • आता शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी वेगळा Corona Vaccination Slot, असा करा बुक

आता शिक्षक आणि शाळेतील कर्मचाऱ्यांसाठी वेगळा Corona Vaccination Slot, असा करा बुक

शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण (पूर्ण होणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन कोविन पोर्टलमध्ये या दोन्ही कॅटेगरींसाठी स्वतंत्र स्लॉट उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

  • Share this:
नवी दिल्ली 31 ऑगस्ट : गेली दीड ते दोन वर्ष कोरोना महामारीमुळे (Coronavirus in India) सामाजिक परिस्थिती ढवळून निघाली आहे. आता हळूहळू परिस्थिती पूर्वपदावर येते आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची (3rd Wave of Coronavirus) भीती अजूनही व्यक्त होत असली तरीही देशभरातील अनेक राज्यांनी शाळा सुरू करण्यासंबंधी निर्णय घेण्यासाठी विचार सुरू केला आहे. केंद्र सरकारने देशातील लसीकरणावर (Corona Vaccination) भर दिला असून लसीकरणाच्या नियोजनासाठी सुरू केलेल्या CoWin पोर्टलमध्येही (CoWin Portal) वेळोवेळी सुधारणा केल्या आहेत. शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक आणि शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण (पूर्ण होणं गरजेचं आहे हे लक्षात घेऊन कोविन पोर्टलमध्ये या दोन्ही कॅटेगरींसाठी स्वतंत्र स्लॉट (Separate booking slots for teachers, school support staff ) उपलब्ध करून देण्यात आले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’नं याबाबतचं वृत्त दिलं आहे. शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करण्यासाठी केंद्र सरकारने राज्यांना कोविड-19 प्रतिबंधक लसीचे 2 कोटी जादाचे डोस दिले आहेत. 5 सप्टेंबरला असणाऱ्या राष्ट्रीय शिक्षक दिनापूर्वी शिक्षकांचं (National Teachers Day) मोठ्या प्रमाणात लसीकरण व्हावं असा सरकारचा विचार आहे. Delta नंतर आता C.1.2; लशीलाही चकवा देणारं कोरोनाचं आणखी एक भयंकर रूप लसीकरणासंबंधी राष्ट्रीय तांत्रिक सल्लागार गटाचे अध्यक्ष एन. के. अरोरा म्हणाले, ‘ राज्यांनी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण (Vaccination of teachers, school support staff ) पूर्ण करावं. त्यापैकी बहुतेक जणांनी पहिला डोस घेतला आहे. लसीकरणाचा वेग आता वाढवायला हवा. आता शाळा पुन्हा सुरू होणार आहेत त्यामुळे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी लसीकरण करून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे.’ देशात सध्या 97 लाख शिक्षक आहेत. नीती आयोगाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी काही दिवसांपूर्वी यापैकी 50 टक्के शिक्षकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, अशी माहिती दिली होती. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान (Education Minister) यांनीही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर भर दिला असून शाळा पुन्हा सुरू करण्यासाठी ते अत्यंत महत्त्वाचं आहे असं म्हटलं आहे. कोरोना महामारीमुळे मार्च 2020 पासून शाळा बंद आहेत. जवळजवळ 18 महिने शाळा बंद राहिल्यामुळे मुलांच्या शारीरिक तसंच मानसिक विकासावर परिणाम झाला आहे. त्यामुळे शाळा सुरू करणं गरजेचं आहे. प्रधान ट्विटमध्ये म्हणाले, ‘सर्व राज्यांनी शिक्षकांच्या लसीकरणाच्या या अभियानाला पाठिंबा द्यावा आणि भारताच्या भविष्याचा पाया तयार करण्यात योगदान द्यावं.’ मुंबईत Covid Alert! रुग्णसंख्या वाढल्याने पुन्हा निर्बंधांची काटेकोर अंमलबजावणी, तज्ज्ञांचं मत आहे की राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांनी Unified District Information System of Education data चा वापर करून शिक्षण विभाग, केंद्रीय विद्यालय संघटना, नवोदय विद्यालय संघटना यांचा उपयोग करून लसीकरण पूर्ण करावं.
First published: