ज्येष्ठ साहित्यिक, चित्रकार प्रभू जोशी यांचं कोरोनानं निधन, हे आहेत शेवटचे शब्द..

ज्येष्ठ साहित्यिक, चित्रकार प्रभू जोशी यांचं कोरोनानं निधन, हे आहेत शेवटचे शब्द..

ज्येष्ठ साहित्यिक चित्रकार प्रभू जोशी (Prabhu Joshi die) यांचे वयाच्या 71 व्या वर्षी कोरोना संसर्गाने (Corona Infection) निधन झाले. त्यांनी मंगळवारी जगाचा निरोप घेतला, त्यांनी दोनच दिवसांपूर्वी उद्गारलेले शब्द त्यांच्या कुटुंबीयांमार्फत आता समोर आले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 मे : ज्येष्ठ साहित्यिक चित्रकार प्रभू जोशी (Prabhu Joshi die) यांचं वयाच्या 71 व्या वर्षी कोरोना संसर्गाने (Corona Infection) निधन झालं. त्यांनी मंगळवारी जगाचा निरोप घेतला, त्यांनी दोनच दिवसांपूर्वी उद्गारलेले शब्द त्यांच्या कुटुंबीयांमार्फत आता समोर आले आहेत.

दोन दिवसांपूर्वी प्रभू जोशी यांना श्वसनाचा त्रास होत होता. त्यांचा कोरोना अहवालही पॉझिटिव्ह होता. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी संबंधित बातम्या आणि होणारे मृत्यू याविषयी ऐकून ते काहीसे घाबरलेले होते, अशी माहिती त्यांच्या घरच्यांनी दिली. त्यांचा मुलगा पुनर्वसू त्यांना काळजीत पडलेले पाहून त्यांच्याजवळ गेला आणि त्यांनी वडिलांच्या छातीवर हात ठेवून त्यांना धीर दिला. तुमच्यासाठी अनेक जण प्रार्थना करत आहेत, तुम्ही बरे व्हाल, असेही समजावले. त्यावर साहित्यिक जोशी यांनी पुढील शब्द उच्चारले. 'बाळा मृत्यूला कान नसतात, त्याच्यापर्यंत आपला कोणताही आवाज पोहोचत नाही. त्याला फक्त डोळे असतात. त्या डोळ्यांनी तो एकटक पाहत राहतो आणि एखाद्या दिवशी या जगाच्या पलीकडे घेऊन जातो.. आणि झालेही तसेच.

हे वाचा - कोरोनानं एकुलत्या एक मुलाचा घेतला घास; विरह सहन न झाल्यानं माऊलीनंही सोडले प्राण

आम्हाला वाटलेही नव्हते की, 'त्यांचे हे बोलणे आमच्यासाठी आणि त्यांच्या हजारो-लाखो चाहत्यांसाठी शेवटचे ठरेल, असे प्रभू जोशी यांच्या मुलाने म्हटले आहे. ते नेहमी म्हणत असत की, काळ आणि आकाश यांच्यामध्ये मी पूर्णविराम कसा देवू. मात्र, अखेर कोरोनाने त्यांच्या जीवनालाच आता पूर्णविराम लावला', असे त्यांचे पुतणे शतायु यांनी म्हटले. त्यांना अंतिम निरोप देतानाही त्यांच्या तोंडी हेच शब्द होते.

लेखन चित्रकला रेडिओ आणि चित्रांकन यामध्ये पारंगत

प्रभू जोशी यांची पहिली कथा धर्मयुग 1973 मध्ये प्रकाशित झाली. त्यांचे आत्तापर्यंत तीन कथासंग्रह प्रकाशित आणि सहा अप्रकाशित आहेत. त्यांना अडीच हजार डॉलर्सचा गॅलरी फॉर कॅलिफोर्निया (Gallery for California) हा पुरस्कार मिळाला होता. तसेच थामसमोरान हा पुरस्कारही मिळाला होता त्यांना बर्लिनमध्ये विशेष पुरस्कार मिळाले. तसेच अनेक रेडिओ कार्यक्रमांसाठीही त्यांना पुरस्कार मिळाले होते. त्यांनी तीन टेलिफिल्म बनवल्या.

हे वाचा - Pune News: ‘केअर टेकर’ बनून आले अन् लाखोंचा माल लुटला, वृद्धांना लुबाडणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

रुग्णालयात जाण्यासही नव्हते तयार..

प्रभू जोशी यांचे 50 वर्षांपासूनचे जुने मित्र लेखक ज्ञान चतुर्वेदी म्हणाले की, सोमवारी सायंकाळी त्यांची प्रकृती बिघडली होती. डॉक्टर अपूर्व पौराणिक यांच्याकडे मेदांता येथे त्यांना दाखल करण्यात आले. त्यांचा मुलगा पुनर्वसू त्यांना रुग्णालयात घेऊन गेला होता, मात्र मागील काही दिवसांपासून कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूमुळे प्रभू इतके घाबरले होते की, त्यांची ऑक्सिजन पातळी 60 ते 65 पर्यंत खाली आल्यानंतरही रुग्णालयात दाखल होण्यास ते तयार नव्हते. त्यामुळे रात्री नऊ वाजता त्यांना घरी परत आणण्यात आले, यानंतर पहाटे चार वाजता पुनर्वसू यांनी व्हाट्सअपवर दोन ऑक्सिजन सिलेंडर हवे असल्याचे सांगितले. तेव्हा मी प्रभू यांना फोन करून थोडेसे रागावलो. त्यांना समजावून पुन्हा रुग्णालयात जाण्यास सांगितले. ते रुग्णालयात जाण्यास तयार झाले, वरिष्ठ पत्रकार श्रवण गर्ग त्यांच्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन पोहोचले मंगळवारी सकाळी दहा वाजता अरबिंदो येथे एक बेड मिळाला. तेथे घेऊन जात असताना रुग्णवाहिकेत ते मुलगा पुनर्वसु यांना म्हणाले, गुड्डू मी थकलो आहे बाबा.. असे बोलून त्यांनी मुलाला मिठी मारली आणि या जगाचा निरोप घेतला.

Published by: News18 Desk
First published: May 5, 2021, 12:23 PM IST

ताज्या बातम्या