नवी दिल्ली 10 मे : देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा (Second Wave of Coronavirus) कहर सुरू आहे. मागील चार दिवसांपासून सलग 4 लाखाहून अधिक दैनंदिन रुग्णसंख्या (Corona Cases) आढळत आहे. इतकंच नाही तर मृतांचा आकडाही चार हजारावर पोहोचत आहे. अशात लोकांच्या मनात मोठा सवाल आहे, की या लाटेतील रुग्णसंख्येचा उच्चांक (Covid-19 Second Wave Peak) नेमका कधी असेल आणि कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा कधी घटेल. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत देश आणि विदेशातील अनेक तज्ज्ञांनी वेगवेगळे अंदाज वर्तवले आहेत. यानुसार, भारतात दहा दिवसांनंतर सर्वात कठीण परिस्थिती असेल. अनेक तज्ज्ञांनी आपल्या रिपोर्टमध्ये असा दावा केला आहे, की मे महिन्याच्या तिसऱ्या आणि चौथ्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येचा उच्चांक पाहायला मिळेल आणि या काळात देशात 35 ते 40 लाख सक्रीय रुग्ण असतील. तर, अनेक तज्ज्ञांनी असंही म्हटलं आहे, की दुसऱ्या लाटेत जितक्या झपाट्यानं रुग्णसंख्या वाढली, तितक्याच झपाट्यानं ती कमीदेखील होईल. ही बाब दिलासादायक आहे.
दुसऱ्या लाटेच्या उच्चांकाबाबत वेगवेगळे दावे -
एसबीआय रिसर्च रिपोर्टनुसार, देशात कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या मध्यापर्यंत उच्चांकावर असेल. रिपोर्टमध्ये असं म्हटलं गेलं आहे, की या काळात देशात कोरोनाची अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 36 लाखाच्या आसपास असेल. इतर देशांचे अनुभव पाहाता कोरोनाची दुसरी लाट तेव्हा उच्चांकावर असेल जेव्हा रिक्वहरी रेट 77.8 टक्के होईल. द पॉवर ऑफ व्हॅक्सिनेशनच्या रिपोर्टमध्ये ३० एप्रिलला असं म्हटलं गेलं आहे, की रिक्वहरी रेटमध्ये एका टक्क्याची घट 4.5 दिवसात होत आहे. म्हणजेच यासाठी तब्बल वीस दिवस लागतील. रिकव्हरी रेटमधील एक टक्का कमीनं सक्रीय रुग्णसंख्या 1.85 लाखानं वाढते. रिपोर्टमध्ये असंही म्हटलं गेलं आहे, की अनेक राज्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट तेव्हा पीकवर असेल जेव्हा संपूर्ण देशभरात रुग्णसंख्येनं उच्चांक गाठला असेल. रिपोर्टमध्ये अशी आशा व्यक्त केली गेली आहे, की याचा सर्वात वाईट काळ मे महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत संपलेला असेल.
आयआयटी
आयआयटी कानपूर आणि हैदराबादच्या गणितीय मॉडेलनुसार, कोरोना महामारीची दुसरी लाट 11 ते 15 मेदरम्यान पीकवर असेल. शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे, की त्यावेळ देशात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 33 ते 35 लाखापर्यंत पोहोचू शकते. मे महिन्याच्या शेवटापर्यंत रुग्णसंख्येत झपाट्यानं घट होणार. मात्र, ही घट येण्याआधी मेच्या मध्यापर्यंत सक्रीय रुग्णांची संख्या 10 लाखानं वाढेल.
ब्राउन युनिवर्सिटी -
ब्राउन युनिवर्सिटीच्या आशीष के झा यांच्या म्हणण्यानुसार, रुग्णसंख्या उच्चांक कधी गाठेल हे ज्या त्या राज्यांवर अवलंबून आहे. महाराष्ट्रात आधीच रुग्णसंख्येचा उच्चांक गाठलेला आहे. तर, पश्चिम बंगालसह इतर राज्यांमध्ये हा उच्चांक येणं आणखी बाकी आहे. त्यांनी म्हटलं, की माझ्या मतानुसार, जून महिन्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळतील. त्यांनी म्हटलं, की रुग्णसंख्या जितक्या झपाट्यानं वाढत आहे, जितक्याच झपाट्यानं ती कमी होईल, यात शंका आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.