मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

मे महिन्यात उच्चांकावर असणार Corona, दिवसाला 5 हजारहून अधिकांचा होणार मृत्यू!

मे महिन्यात उच्चांकावर असणार Corona, दिवसाला 5 हजारहून अधिकांचा होणार मृत्यू!

भारतात मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना संसर्ग (Second Wave of Coronavirus Likely to Peak in Mid of May ) उच्चांकावर असेल. मेच्या मध्यापर्यंत, दररोज मृत्यूची संख्या 56०० होईल, असं अभ्यासकांचं म्हणणं आहे.

  • Published by:  Kiran Pharate

नवी दिल्ली 24 एप्रिल : अमेरिकन विद्यापीठाच्या एका अभ्यासानुसार असा इशारा देण्यात आला आहे, की भारतात मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना संसर्ग (Second Wave of Coronavirus Likely to Peak in Mid of May ) उच्चांकावर असेल. मेच्या मध्यापर्यंत, दररोज मृत्यूची संख्या 56०० होईल, हीच परिस्थिती राहिल्यास एप्रिल ते ऑगस्ट दरम्यान कोरोनाच्या संसर्गामुळे जवळजवळ तीन लाख लोक आपला जीव गमावतील. अमेरिकन विद्यापीठाच्या इनस्टिट्यूट फॉर हेल्थ मॅट्रिक्स अॅण्ड इव्हॅल्यूएशनद्वारे 'कोविड-19 प्रोजेक्शन' नावावर अभ्यास केला गेला असून 15 एप्रिलला त्याचा अहवाल प्रसिद्ध केला गेला.

या अभ्यासात असा दावा केला गेला आहे, की कोरोनाची स्थिती येत्या काही आठवड्यांमध्ये आणखीच बिकट होईल. सध्या भारतात नोंदवल्या जाणाऱ्या रुग्णसंख्येच्या आणि मृतांच्या आकड्याच्या आधारे या अभ्यासाता असं म्हटलं आहे, की मे महिन्याच्या मध्यापर्यंत कोरोना पीकवर असेल. यानुसार, 10 मेपर्यंत दररोजचा मृतांचा आकडा 5600 वर पोहोचेल. तर, एप्रिल ते एक ऑगस्टच्या दरम्यान मृतांचा आकडा 3 लाख 29 हजार इतका होईल.

या अभ्यासात असंही म्हटलं गेलं आहे, की एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यापर्यंत सर्वांनी मास्कचा वापर करणं गंभीरतेनं घेतलं, तर मृत्यूचा हा आकडा 70 हजारापर्यंत कमी होऊ शकतो.

राजधानी दिल्लीतील Corona स्थिती बिकट; एकाच दिवसात 348 रुग्णांचा मृत्यू

अहवालात असंही म्हटलं गेलं आहे, की सप्टेंबर 2020 ते फेब्रुवारी 2021यादरम्यान भारतात कोरोना रुग्णांच्या आणि मृतांच्या संख्येत मोठी घट झाली होती. मात्र, अचानक कोरोनानं पुन्हा वेग पकडला आणि रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढू लागली. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात कोरोना पीकवर होता, तेव्हापेक्षाही आता रुग्णसंख्या दुपटीनं वाढली. एप्रिलच्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यात कोरोना रुग्णसंख्येत 71 टक्क्यांची वाढ नोंदवली गेली आहे. तर, मृतांचा आकडाही 55 टक्क्यांनी वाढला आहे. यामागचं कारण, सोशल डिस्टन्सिंगचं उल्लंघन आणि मास्कचा वापर न करणं, हे असल्याचं सांगितलं जात आहे.

अहवालात असा अंदाज वर्तवण्यात आला आहे, की भारतात 12 एप्रिलपर्यंत 24 टक्के लोक विषाणूच्या संपर्कात आले आहेत, मात्र या गंभीर स्थितीमध्ये आयएचएमईच्या तज्ज्ञांनी कोरोना लसीकरणावर मोठा विश्वास दर्शवला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, जुलै महिन्याच्या शेवटीपर्यंत लसीकरणामुळे 85,600 लोकांचा जीव वाचवणं शक्य होईल.

First published:

Tags: Corona spread, Corona updates, Corona virus in india, Coronavirus