नवी दिल्ली 25 एप्रिल : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक प्रभाव मध्यमवर्गीय आणि उच्चवर्गीय लोकांमध्ये दिसून येत आहे. मुंबईमधील (Corona Cases in Mumbai) इमरतींमध्ये तब्बल 1,70,000 घरं सील आहेत. तर, झोपडपट्ट्यांमधील कंटेन्टमेंट झोनमध्ये 1,20,000 घरं सील आहेत. हे तेच मध्यमवर्गीय (Middle Class) आहेत, जे देशातील आर्थिक आणि सामाजिक संकटापासून आतापर्यंत वाचले आहेत. मात्र, कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव सर्वाधिक त्यांच्यावरच झाला आहे. मुंबईचे महानगरपालिका उपायुक्त सुरेश काकणी (Suresh Kakani) यांच्या म्हणण्यानुसार, बहुतेक प्रकरणं झोपडपट्टीतील नसून इमारतींमधून येत आहेत.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत, देशातील तथाकथित ग्राहक वर्ग प्रभावित झाला आहे. अशा परिस्थितीत देशाच्या विकासाच्या गतीवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे, कारण हाच वर्ग देशातील अर्थव्यवस्थेत 60 टक्के खरेदी करतो. मध्यवर्ती बँकेचा ग्राहक कॉन्फिडंसच्या सर्वेक्षणातही असंच म्हटलं आहे, की नोकरीच्या बाबतीतही चिंतेचं वातावरण आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कहर, शेयर बाजार निच्चांक गाठणार?
मुंबई आणि पुण्याबद्दल बोलायचं झालं, तर राज्यातील एकूण अॅक्टिव्ह रुग्णांपैकी 30 टक्के रुग्ण या दोन शहरांमधील आहेत. महाराष्ट्रातील एकूण लोकसंख्येच्या 14 टक्के लोक मुंबई आणि पुण्यात राहातात. या आठवड्यात आलेले 90 टक्के रुग्ण मोठमोठ्या इमारतींमधील आहेत तर 10 टक्के रुग्ण झोपडट्टीतील आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेत मध्यमवर्गीय लोक का वाचले, याचं कारण हे आहे की पंतप्रधानांनी लॉकडाऊनची घोषणा करताच सर्व आपल्या घरांमध्ये कैद झाले. याच कारणामुळे दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका त्यांना बसला.
सर्वांनाच कोरोनाबाधित मानण्याचा सल्ला देतात अमेरिकेतील तज्ज्ञ; काय आहे कारण?
विषाणूचा प्रसार पाहिला तर तो झोपडपट्टीमध्ये खूप झपाट्यानं झाला आणि निघूनही गेला. 2020 च्या मध्यात झालेल्या सर्व्हेनुसार, मुंबईतील झोपडपट्टी भागातील अर्ध्या लोकांच्या शरिरामध्ये अँटीबॉडीज आढळल्या आहेत. याच अँटीबॉडी या लोकांना दुसऱ्या लाटेपासून वाचवत असतील, ही शक्यताही नाकारता येणार नाही. तर, पहिल्या लाटेत वाचलेल्यांसाठी कोरोना धोकादायक ठरत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.