देशात येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट! तीन राज्यात परिस्थिती गंभीर, धक्कादायक आकडेवारी आली समोर

देशात येऊ शकते कोरोनाची दुसरी लाट! तीन राज्यात परिस्थिती गंभीर, धक्कादायक आकडेवारी आली समोर

देशातील नवीन रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दुसरीकडे देशाताल रिकव्हरी रेट 90% आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 25 ऑक्टोबर : देशातील कोरोना रुग्णांची संख्या कमी होताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत देशात 50 हजार 129 नवीन रुग्ण सापडले. तर, 578 रुग्णांचा मृत्यू झाला. देशातील नवीन रुग्णांची संख्या कमी झाली असली तरी, महाराष्ट्र, केरळ, पश्चिम बंगाल आणि दिल्लीमध्ये रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दुसरीकडे देशाताल रिकव्हरी रेट 90% आहे.

देशाचा रिकव्हरी रेट वाढत असला तरी केरळपेक्षा महाराष्ट्रातील रुग्णांची संख्या वाढली आहे. सध्या केरळ, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि महाराष्ट्रात अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या जास्त आहे. सध्या देशात 78 लाख 64 हजार 811 रुग्ण आहेत. तर एकूण मृतांची संख्या 1 लाख 18 हजार 534 झाली आहे. तर, अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 6 लाख 68 हजार 154 झाली आहे. रिकव्हर रुग्णांची संख्या 70 लाख 78 हजार 123 झाली आहे.

वाचा-कोरोनानं लेदर बॉलप्रमाणे रुग्णाच्या फुफ्फुसांची अवस्था, पाहा X-ray रिपोर्ट

वाचा-खुलासा! Corona तून रिकव्हरीनंतर किती महिन्यांपर्यंत शरीरात राहू शकते अँटीबॉडी?

राज्याचा रिकव्हरी रेट जास्त

राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येतली घट सलग गेल्या काही दिवसांपासून कायम आहे. तर कोरोना मुक्त होणाऱ्यांची संख्या वाढत असून राज्यांचं कोरोनामुक्तीचं प्रमाण हे 89 टक्क्यांच्या जवळ गेलं आहे. शनिवारी राज्यात 10,004 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर 6,417 रुग्णांची नव्याने भर पडली. राज्यात 137 जणांचा मृत्यू झाला. राज्यात कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 16,38,961 एवढी झाली आहे. तर 14,55,107 जण कोरोनामुक्त झाले. तर आत्तापर्यंत 43,152 जणांचा मृत्यू झाला. राज्यात सध्या 1,40,194 एवढ्या रुग्णांवर उपचार सुरू आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: October 25, 2020, 10:41 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading