• Home
 • »
 • News
 • »
 • coronavirus-latest-news
 • »
 • 6 ते 12 वयोगटातील मुलांना Covaxinचा दुसरा डोस, कोरोनाविरुद्धच्या लढाईत एक पाऊल पुढे

6 ते 12 वयोगटातील मुलांना Covaxinचा दुसरा डोस, कोरोनाविरुद्धच्या लढाईत एक पाऊल पुढे

भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीनं जून महिन्यात लहान मुलांवर लसींची चाचणी सुरू केली होती. या मुलांना आता दुसरा डोस (Second dose) देण्यात आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 19 जुलै : देशात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेशी (Third wave of Corona virus) झुंज देण्याची तयारी सुरु असतानाच लहान मुलांच्या (Vaccination of children) लसीकरण चाचण्यांबाबतीत भारतानं आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. भारत बायोटेक (Bharat Biotech) कंपनीनं जून महिन्यात लहान मुलांवर लसींची चाचणी सुरू केली होती. या मुलांना आता दुसरा डोस (Second dose) देण्यात आला आहे. 6 ते 12 वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला मंजुरी मिळण्याच्या प्रवासातील हा मोठा टप्पा आहे. 6 ते 12 वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे, तर 2 ते 6 या वयोगटातील मुलांना पुढील आठवड्यात दुसरा डोस दिला जाणार असल्याची माहिती आहे. या दोन्ही चाचण्यांचे अहवाल आल्यानंतर या लशींची परिणामकारकता किती आहे, हे स्पष्ट होणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना बसू शकतो, असाइशारा यापूर्वी अनेकदा दिला गेला आहे. या पार्श्वभूमीवर तिसऱ्या लाटेसोबतच लहान मुलांच्या लसीकरणालाही सुरुवात होईल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. हे वाचा -Explainer : कोरोनाची तिसरी लाट आली? आकडेवारी नेमकी काय संकेत देतेय? झायडस कँडिलाही सज्ज झायडस कँडिला लसीच्या सर्व चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. लवकरच अधिकृत परवानगी मिळण्याची प्रक्रिया पूर्ण होऊन लस बाजारात उपलब्ध होण्याची शक्यता आहे. भारतात 18 वर्षांखाली व्यक्तींसाठी उपलब्ध होणारी ही पहिली लस असेल, असा अंदाज सध्या वर्तवला जात आहे. भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनपूर्वीच ही लस बाजारात उपलब्ध होईल, असा अंदाज आहे. झायडस कँडिला लशीच्या चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. एकूण 28 हजार स्वयंसेवकांवर या लशीचे प्रयोग करण्यात आले आहेत आणि यामुळे 12 ते 18 वयोगटातील मुलांच्या शरीरात अँटिबॉडिज निर्माण व्हायला मदत होत असल्याचं दिसून आलं आहे. या लशीला मंजुरी मिळाली, तर देशात लसपुरवठा करणारी झायडस ही पाचवी कंपनी करणार आहे. यापूर्वी कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिन, स्पुटनिक-व्ही आणि अमेरिकेतील मॉर्डना लशीला मंजुरी देण्यात आली आहे.
  Published by:desk news
  First published: