मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

Covishield, Covaxin की दोन्ही? Omicron या नव्या व्हायरसवर कुठली लस अधिक परिणामकारक? तज्ज्ञ काय सांगतात

Covishield, Covaxin की दोन्ही? Omicron या नव्या व्हायरसवर कुठली लस अधिक परिणामकारक? तज्ज्ञ काय सांगतात

कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे डोस नव्या ओमिक्रॉन व्हायरसला रोखण्यासाठी प्रभावी (Scientists tells how vaccines are effective against new Omicron virus) ठरतील का, याचं उत्तर अखेर तज्ज्ञांनी दिलं आहे.

  • Published by:  desk news

मुंबई, 29 नोव्हेंबर: कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या लसींचे डोस नव्या ओमिक्रॉन व्हायरसला रोखण्यासाठी प्रभावी (Scientists tells how vaccines are effective against new Omicron virus) ठरतील का, याचं उत्तर अखेर तज्ज्ञांनी दिलं आहे. भारतातील बहुतांश लोकसंख्येला देण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड आणि कोव्हॅक्सिन या दोन्ही लसी अत्यंत प्रभावी (Covishield and Covaxin are effective against Omicron) असून त्याचा फायदा ओमिक्रॉनविरुद्ध लढण्यासाठी होईल, असं शास्त्रज्ञांनी स्पष्ट केलं आहे. ज्यांनी लसींचे दोन्ही डोस घेतले आहेत, त्यांना नव्या व्हेरिएंटपासून (New variant less dangerous) असणारा धोका कमी असल्याची माहिती तज्ज्ञांनी दिली आहे.

हा फायदा नक्की होईल

नवा व्हेरिएंट हा लसीकरण झालेल्यांच्या शरीरात प्रवेश करू शकेल, मात्र त्याचा प्रभाव फारसा जाणवणार नसल्याचं ज्येष्ठ शास्त्रज्ञ रमण गंगाखेडकर यांनी म्हटलं आहे. ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या बातमीनुसार लसीकरण झालेल्या नागरिकांना कोरोनाचा नवा व्हेरिएंट अस्वस्थ करू शकेल. मात्र हॉस्पिटलमध्ये दाखल होणे किंवा मृत्यू होणे यासारख्या संकटांपासून दिलासा मिळण्यात लसीकरणाचा मोठा सहभाग असेल, असं त्यांनी म्हटलं आहे. म्हणजेच लसीकरण झालेल्या व्यक्तींना नव्या व्हेरिएंटमुळे किरकोळ त्रास जाणवू शकेल, मात्र त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शास्त्रज्ञांचा जलद प्रतिसाद

नव्या व्हेरिएंटचं अस्तित्व समोर आल्यानंतर केवळ तीन दिवसांत शास्त्रज्ञांनी त्याच्याविषयी भाष्य केलं आहे. आतापर्यंत नव्या व्हेरिएंटवर दीर्घ काळ संशोधन झाल्यावर शास्त्रज्ञ एखाद्या निष्कर्षावर पोहोचत होते. मात्र आतापर्यंत ओमिक्रॉनचे 100 पेक्षा जास्त सँपल्स तपासण्यात आले असून त्यावरून कोरोना प्रतिबंधक लसी या नव्या व्हेरिएंटवर प्रभावी ठरत असल्याचं दिसून आलं आहे.

हे वाचा- मोठी बातमी: द.आफ्रिकेवरून आलेल्या डोंबिवलीकराच्या कुटुंबियांचा Coronaरिपोर्ट आला

लसीकरण पूर्ण झालेल्यांना अधिक संरक्षण

कोरोना प्रतिबंधक लसींचा दुसरा डोस हा केवळ अँटिबॉडिज वाढवत नाही, तर शरीरातील टी-सेल्सदेखील वाढवत असल्याचं गंगाखेडकर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या कुठलाही व्हेरिएंट शरीरात आला तरी त्याला त्वरित ओळखून त्याच्यावर हल्ला करण्याची शरीराची क्षमता असल्याचं ते म्हणतात. अर्थात, ओमिक्रॉन व्हायरसची लागण झाल्यानंतर होणाऱ्या इतर परिणामांपासून सध्याच्या लसी कितपत संऱक्षण करू शकतात, ते मात्र अधिक संशोधनानंतरच स्पष्ट होईल, असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccination, Health