Home /News /coronavirus-latest-news /

आता चीनजवळच्या लाओस देशात वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडल्यानं खळबळ, थेट माणसांमध्ये संक्रमणाचा धोका

आता चीनजवळच्या लाओस देशात वटवाघळांमध्ये कोरोना विषाणू सापडल्यानं खळबळ, थेट माणसांमध्ये संक्रमणाचा धोका

आशियाई देश लाओसमधील (Laos) गुंफांमध्ये राहणाऱ्या वटवाघळांमध्ये असाच रोगजनक (Pathogen) आढळला आहे. हे विषाणू थेट मानवांना संक्रमित करू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे.

    नवी दिल्ली, 23 सप्टेंबर : शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूच्या उत्पत्तीसंबंधी आणखी एक दुवा शोधला असल्याचा दावा केला आहे. यावरून कोरोना विषाणूसंबंधी अधिक माहिती मिळण्याची शक्यता आहे. आशियाई देश लाओसमधील (Laos) गुंफांमध्ये राहणाऱ्या वटवाघळांमध्ये असाच रोगजनक (Pathogen) आढळला आहे. हे विषाणू थेट मानवांना संक्रमित करू शकतात, असं तज्ज्ञांचं मत आहे. 2019 च्या उत्तरार्धात चीनमध्ये संसर्गास सुरुवात झालेल्या कोरोना विषाणूनं आतापर्यंत लाखो लोकांचा बळी घेतला आहे. हा विषाणू कसा उत्पन्न झाला, यावर वाद सुरू आहे. काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, हा विषाणू प्राण्यांद्वारे पसरला आहे. तर, काहींनी तो प्रयोगशाळेतून बाहेर पडल्याच्या शक्यतेकडे लक्ष वेधलंय. फ्रान्सच्या पाश्चर इन्स्टिट्यूट आणि नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ लाओसच्या संशोधकांनी त्यांच्या शोधात SARS-CoV-2 विषाणूसारखा विषाणू उत्तर लाओसमधील चुनखडीच्या गुहांमध्ये असलेल्या वटवाघळांच्या प्रजातींमध्ये असल्याचं दिसून आलं आहे, असं सांगितलंय. व्हिएंटियान प्रांतात चाचणी केलेल्या शेकडो वटवाघळांमधून त्यांनी ओळख पटवलेल्या विषाणूंपैकी तीन विषाणू कोविड -19 ला कारणीभूत असलेल्या विषाणूसारखेच असल्याचं आढळलं आहे. हे वाचा - लाखो रुपयांचा iPhone Switch Off किंवा चोरी झाला तरीही करता येणार ट्रॅक, IOS 15 मिळेल हे खास फीचर या नव्या विषाणूंमध्ये मानवांना संक्रमित करण्याचीही क्षमता पाश्चर इन्स्टिट्यूटच्या पॅथोजेन डिस्कव्हरी लॅबोरेटरीचं नेतृत्व करणारे मार्क एलोइट म्हणाले, "या संशोधनामागील लक्ष्य कोविडच्या साथीचं मूळ शोधणं हे आहे." संकलन केलेल्या नमुन्यांची तपासणी केल्यानंतर मार्क एलोइटच्या टीमनं सांगितलं की, सापडलेले विषाणू आणि SARS-CoV-2 या विषाणूंमध्ये अजूनही काही फरक आहेत. ते म्हणाले की, साथीचं मूळ शोधण्याच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. हे संशोधन जगभर पसरलेला कोरोना विषाणू जिवंत वटवाघळांपासून सुरू झाला असावा, या सिद्धांताची पुष्टी करतो. त्यांनी इशारा दिलाय की, त्यांचे नव्या विषाणूंबाबतचे निष्कर्ष असं सुचवतात की, नवीन विषाणूमध्ये SARS-CoV-2 प्रमाणेच मानवांना संक्रमित करण्याची क्षमता आहे. हे वाचा - LIC Housing देत आहे स्वस्तात घरखरेदीची संधी! कमी व्याजदरात मिळेल 2 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज ते म्हणाले, "गुहेत काम करणारे लोक, जसं की गुआनो कलेक्टर्स किंवा काही तपस्वी धार्मिक समुदाय जे या गुंफांमध्ये बराच काळ घालवतात, तसंच या गुंफांना भेट देणारे पर्यटक यांना या विषाणूंचा संसर्ग होण्याचा धोका असू शकतो." रिसर्च स्क्वेअर साइटवर पोस्ट केलेल्या लाओसमधील या अभ्यासानुसार, या संशोधनाचे निष्कर्ष असंही सूचित करतात की, कोरोना विषाणूमुळं पसरलेला साथीचा रोग अनेक विषाणू आणि वटवाघळांच्या प्रजातींच्या मिश्रणामुळं तयार झाला असण्याची शक्यता आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona updates, Corona virus in india, Coronavirus

    पुढील बातम्या