Home /News /coronavirus-latest-news /

धक्कादायक! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा, हॉटेलमध्ये दोघांना अशी झाली लागण

धक्कादायक! ओमिक्रॉन हवेतून पसरत असल्याचा दावा, हॉटेलमध्ये दोघांना अशी झाली लागण

हॉटेलमध्ये समोरा-समोर खोलीत राहणाऱ्या दोन प्रवाशांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे दोन्ही प्रवाशांना लसीचे सर्व डोस मिळाले होते. ओमिक्रॉनचा संसर्ग हवेतूनही पसरत असल्याचा दावा केला जात आहे.

    नवी दिल्ली, 06 डिसेंबर : ओमिक्रॉन या कोरोना विषाणूच्या (corona virus) नवीन प्रकारामुळे जगभरात भीतीचे सावट असताना चिंता वाढवणारी आणखीन एक घटना समोर आली आहे. हाँगकाँगमधील एका हॉटेलमध्ये क्वारंटाईनमध्ये असूनही दोन रुग्णांमध्ये ओमिक्रॉनचा (Omicron) संसर्ग पसरला आहे. हॉटेलमध्ये समोरा-समोर खोलीत राहणाऱ्या दोन प्रवाशांना ओमिक्रॉनची लागण झाली आहे. चिंतेची बाब म्हणजे दोन्ही प्रवाशांना लसीचे सर्व डोस मिळाले होते. ओमिक्रॉनचा संसर्ग हवेतूनही पसरत असल्याचा यावरून दावा केला जात आहे. हिंदुस्थान टाइम्सने दिलेल्या बातमीनुसार, जर्नल इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीजमध्ये याबद्दल माहिती प्रकाशित करण्यात आली आहे. या दोन रुग्णांवर केलेल्या स्टडीनुसार, 13 नोव्हेंबरला एक रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळला, त्याला कोणतीही लक्षणे दिसत नव्हती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि त्याला नंतर हॉटेलमध्ये वेगळे ठेवले गेले, तर दुसऱ्या रुग्णामध्ये 17 नोव्हेंबर रोजी सौम्य लक्षणे दिसली आणि तो SARS-CoV-2 पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. हे वाचा - WhatsApp Scam: अनोळखी नंबरवरुन Video Call आल्यास सावधान, असं केलं जातंय ब्लॅकमेल इमर्जिंग इन्फेक्शियस डिसीज या जर्नलमध्ये शुक्रवारी प्रकाशित झालेल्या अभ्यासात, हाँगकाँग विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले की, सीसीटीव्ही कॅमेरा फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, दोन्ही रुग्णांनी त्यांची खोली सोडलेली नाही किंवा त्यांचा एकमेकांशी संपर्कही झालेला नाही. फक्त अन्न पदार्थ घेण्यासाठी किंवा कोरोना चाचणीसाठी दरवाजे उघडले गेले होते. त्यामुळे हा संसर्ग हवेतून पसरत असल्याचे अभ्यासातून दिसून येत आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की, दरवाजा उघडल्यानंतर ओमिक्रॉनचा विषाणू हवेतून एका खोलीतून दुसऱ्या खोलीमध्ये गेला असावा. कॉरिडॉरमध्ये हवेतून प्रसारित झाल्यामुळे विषाणूचा प्रसार झाला असावा असे सांगण्यात येत आहे. हे वाचा - मोठी बातमी ! सुप्रीम कोर्टाचा ठाकरे सरकारला दणका, ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या अध्यादेशाला स्थगिती ओमिक्रॉन प्रकार प्रथम 11 नोव्हेंबर रोजी बोत्सवानामध्ये आणि तीन दिवसांनी दक्षिण आफ्रिकेत ओळखला गेला. त्यानंतर संपूर्ण जगात खळबळ उडाली आणि त्यानंतर अनेक देशात रुग्ण सापडले आहेत. भारतासह जगातील डझनभर देशांमध्ये त्याचा प्रसार झाला आहे. आतापर्यंत भारतात या प्रकाराची जवळपास 21 रुग्ण आढळून आले आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Corona vaccination, Corona vaccine, Coronavirus

    पुढील बातम्या