कोणत्या घरांमध्ये कोरोना संक्रमणाचा सगळ्यात जास्त धोका? वैज्ञानिकांनी केला खुलासा

कोणत्या घरांमध्ये कोरोना संक्रमणाचा सगळ्यात जास्त धोका? वैज्ञानिकांनी केला खुलासा

कोव्हिड-19 नावाचा हा व्हायरस किती धोकादायक आहे किंवा रुग्णांचे किती नुकसान होत आहे, याचा शोध घेण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करीत आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. भारतात कोरोनाबाधितांचा आकडा 17 लाखांवर गेला आहे. सध्या कोरोनाव्हायरसबाबत (Coronavirus) संशोधन केले जात आहे. कोव्हिड-19 नावाचा हा व्हायरस किती धोकादायक आहे किंवा रुग्णांचे किती नुकसान होत आहे, याचा शोध घेण्याचा वैज्ञानिक प्रयत्न करीत आहेत. यातच कोणत्या घरांमध्ये कोरोना संक्रमणाचा धोका अधिक आहे, याबाबत वैज्ञानिकांनी खुलासा केला आहे.

वैज्ञानिकांनी केलेल्या अभ्यासानुसार, ज्या घरांमध्ये व्हेंटिलेशनची (ventilation) संपूर्ण व्यवस्था नाही, अशा घरांमध्ये कोरोना संक्रमणाचा अधिक धोका आहे असे दिसून आले. याबाबत आता अमेरिकेच्या मिनेसोटा विद्यापीठानं एक रिपोर्ट सादर केला आहे. यानुसार लहान आणि बंद जागांवर कोरोना केवळ अधिक काळ हवेत राहतो त्याचबरोबर ड्रॉपलेट वेगवेगळ्या जागांवर चिटकून राहतात.

वाचा-कोरोनाबाबत सगळ्यात मोठी अपडेट! भारतात चीन नाही तर युरोपमधून पसरला व्हायरस

या घरांना कोरोनाचा सर्वाता जास्त धोका

सध्याच्या काळात घरं लहान झाली आहे. याआधीही लहान घरांमध्ये राहणे आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे आढळून आले होते. आता कोरोनाच्या संकटात लहान घरांमध्ये राहणाऱ्यांना संक्रमणाचा धोका अधिक वाढला आहे. संशोधनात असे दिसून आले की, मोठ्या आणि हवेशीर घरांमध्ये बंद घरांपेक्षा कोरोनाचा धोका कमी आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की लहान घरांमधील हवा घरात मोठ्या प्रमाणात फिरत राहते आणि मोठ्या घरांमध्ये हवेचा प्रवाह कायम आहे. यासह, सूर्यप्रकाश बंद घरात पोहोचत नाही, ज्यामुळे व्हायरसला वाढण्यास सुरक्षित स्थान मिळते. हवेशीर घरांमध्ये कोरोना विषाणू जास्त काळ थांबत नाही आणि हवेच्या प्रवाहाने घराबाहेर पडतो.

वाचा-भारताचे व्हेंटिलेटर्स विदेशात वाचवणार COVID रुग्णांचे प्राण, निर्यातीला परवानगी

तज्ज्ञांचे विविध दावे

गेल्या काही महिन्यांत कोरोनाबाबत वेगवेगळ्या संस्थांकडून कित्येक अहवाल समोर आले आहेत. कोरोना विषाणूबद्दल जगभरातील शास्त्रज्ञांचे मत भिन्न आहे. कोरोनावरील सुरुवातीच्या अहवालात असे म्हटले आहे की हा व्हायरस 3 फूट अंतरापर्यंत पसरतो. यानंतर असे सांगितले जात होते की ते 6 ते 8 फूट अंतरावर पसरतो. आता असे समोर आले आहे की, कोरोनाचा प्रभाव 13 फूटांपर्यंत आढळून आला आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 2, 2020, 9:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading