Home /News /coronavirus-latest-news /

'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', साताऱ्यात टाळूवरचं लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार

'अंत्यदर्शन करायचं असेल तर 500 रुपये द्या...', साताऱ्यात टाळूवरचं लोणी खाण्याचा धक्कादायक प्रकार

COVID-19 in Satara: कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना जर त्यांचं अंतिम दर्शन घ्यायचं असेल तर त्यांना लाच द्यावी लागत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. नगरपालिका कर्मचारी आणि कोविड सेंटर मधील कर्मचारी यांच्याकडून हा प्रताप केला जात आहे

पुढे वाचा ...
सातारा, 14 मे: कोरोनाचा हाहाकार (Coronavirus in India) देशाची पाठ काही सोडत नाही आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले आहेत. मात्र अशावेळी या रुग्णांच्या नातेवाईकांना धीर देण्याचं सोडून त्यांना लुबाडण्याचं काम काही समाजकंटक करताना दिसत आहेत. असाच एक प्रकार साताऱ्यातून समोर आला आहे जो अत्यंत लज्जास्पद प्रकार आहे. कोरोना बाधित रुग्णांच्या नातेवाईकांना जर त्यांचं अंतिम दर्शन घ्यायचं असेल तर त्यांना लाच द्यावी लागते आहे. नगरपालिका कर्मचारी आणि कोविड सेंटर मधील कर्मचारी यांच्याकडून हा प्रताप केला जात आहे. कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांनी अशाप्रकारे या कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केल्यानंतर या कर्मचाऱ्यांच्या निर्लज्जपणाची कीव केली जात आहे. साताऱ्यात कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी जम्बो कोविड सेंटर उभारण्यात आलं आहे. इथं किंवा जिल्हा शासकीय रुग्णायात कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला की नियमाप्रमाणे सातारा नगरपालिका कर्मचारी अंत्यसंस्कार करतात. त्यामुळे अनेक जण आपल्या नातलगांचं अंतिम दर्शन घेऊ शकत नाहीत. त्यांना हॉस्पिटल बाहेर उभं राहूनच दर्शन घ्यावं लागतं. मात्र आम्ही तुम्हाला अंत्यदर्शन करण्याासठी सहकार्य करतो असं म्हणत कोविड सेंटरचे कर्मचारी आणि नगरपालिका कर्मचारी नातेवाईकांकडून पैसे उकळत आहेत. हे कर्मचारी एकदा चेहरा दाखवण्यासाठी किंवा फोटो काढण्यासाठी  500 रुपये मागत असल्याचा संतापजनक प्रकार घडत आहे.नातेवाईक पण अशा परिस्थितीमध्ये वाद नको म्हणून पैसे देत आहेत. हे वाचा-...आणि 2100 रुपयांच्या चेकसाठी अजित पवारांनी केला आमदार निलेश लंकेंना फोन एवढंच नव्हे तर साताऱ्या कोरोना काळात आवश्यक असणाऱ्या सुविधांची देखील वानवा आहे. ऑक्सिजन बेड, रेमडीसीव्हर यासाठी सुद्धा लोकांची लूट होत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी केला आहे. दरम्यान हे सर्व आरोप रुग्णालय प्रशासनाने फेटाळले आहे. असा कोणताही प्रकार आमचे कर्मचारी करत नसल्याचं प्रतिक्रिया कोविड सेंटरच्या मॅनेजरनी दिली आहे. हे वाचा-कोरोनासोबतचा लढा ठरला अपयशी; 'लव्ह यू जिंदगी' गाण्यावर थिरकणाऱ्या तरुणीचा मृत्यू याप्रकरणी योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी रुग्णांचे नातेवाईक आणि सामान्य नागरिकांकडून केली जात आहे. साताऱ्यात कोरोना टेस्ट, ऑक्सिजन बेड, रेमडीसीव्हर इंजेक्शन असेल किंवा प्लाझ्मा यासाठी नातेवाईकांची लूट केली जात असल्याचे आरोप वारंवार केले जात आहेत. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यावर कारवाई होणं गरजेचं आहे.
Published by:Janhavi Bhatkar
First published:

Tags: Corona, Corona hotspot, Coronavirus, Satara (City/Town/Village), Satara news

पुढील बातम्या