चिंता वाढली; राज्यात सलग दुसऱ्या दिवशी मृतांचा आकडा वाढताच, वाचा 24 तासांतील Corona Updates

चिंता वाढली; राज्यात सलग दुसऱ्या दिवशी मृतांचा आकडा वाढताच, वाचा 24 तासांतील Corona Updates

कालच्या तुलनेत आज मृतांचा आकडा वाढला आहे

  • Share this:

मुंबई, 8 ऑक्टोबर : राज्यातील कोरोनाची आकडेवारी ही चिंता वाढवणारी आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 358 जणांचा मृत्यू झाला असून 13,395 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. काल दिवसभरात 355 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्याचा मृत्यू दर हा 2.64 एवढा झाला आहे. बुधवारीही नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण हे जास्त होतं. आज दिवसभरात 15575 रुग्णांना रुग्णालयातून सोडण्यात आलं असून आतापर्यंत 11,96,441 कोरोना रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी गेले आहेत. सध्या राज्याचा रिकव्हरी रेट 81.13 टक्के इतका आहे. त्यानंतर आज राज्यात 13,395 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

सध्या राज्यात 22,84,204 जण होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर 25,321 जण विविध संस्थांमध्ये क्वारंटाईन आहेत.

आतापर्यंत मुंबईत 9296 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर त्यानंतर सर्वाधिक मृतांची संख्या पुण्यात 6134 इतकी आहे. आतापर्यंत राज्यात 39430 जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असले तरी मृतांचा आकडा वाढत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्यातील कोरोनाची परिस्थितीत चिंता वाढवणारी आहे.

देशातील आकडेवारीवर नजर टाकल्यास भारतातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता 68 लाख 35 हजार 656 झाली आहे. गेल्या 24 तासांत 78 हजार 524 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर, 971 रुग्णांचा मृत्यू झाला. कोरोनामुळे आतापर्यंत 1 लाख 5 हजार 526 लोकांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत 58 लाख 27 हजार 705 लोकं आतापर्यंत रिकव्हर झाले आहेत.

मुंबईतील कोरोना अपडेट्स

गेल्या 24 तासांत मुंबईत 2823 नवीन कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली असून 2933 जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. याशिवाय 48 जणांचा मृत्यू झाला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: October 8, 2020, 9:36 PM IST

ताज्या बातम्या