GOOD NEWS! 2 आठवड्यांत मिळणार कोरोना लस; रशियाने सुरू केलं उत्पादन

GOOD NEWS! 2 आठवड्यांत मिळणार कोरोना लस; रशियाने सुरू केलं उत्पादन

20 पेक्षा अधिक देशांनी रशियन लशीच्या (Russian corona vaccine) अब्जावधी डोसची ऑर्डर दिली आहे.

  • Share this:

मॉस्को, 12 ऑगस्ट : जगातील सर्वात पहिली कोरोना लस तयार करणाऱ्या रशियाने (russia) आता आणखी एक खूशखबर दिली आहे. लशीचं मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू झालं आहे. दोन आठवड्यांत रशियन कोरोना लशीची  (russian corona vaccine) पहिली बॅच तयार होणार आहे. 20 पेक्षा अधिक देशांकडून रशियन लशीच्या अब्जावधी डोसची आधीच ऑर्डर मिळाली आहे, अशी माहिती रशियाने दिली आहे.

रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांनी सांगितलं, आरोग्य कर्मचाऱ्यांसह कुणालाही ही लस घेता येणार आहे. रशियाने यासाठी एक स्पेशल ट्रेसिंग अॅप तयार केलं आहे. या अॅपमार्फत लस घेणाऱ्यांच्या आरोग्यावर लक्ष ठेवलं जाईल. त्यांच्यावर या लसीचा काय परिणाम होतो किंवा काही दुष्परिणाम तर होत नाही ना हे अॅपच्या माध्यमातून तपासलं जाईल. स्पुतनिक न्यूजचा हवाला देत लाइव्ह मिंटने हे वृत्त दिलं आहे.

जगभरातील कोरोना लशीच्या स्पर्धेत रशियाने बाजी मारली आहे. रशियाने जगातील पहिली कोरोना लस तयार केली आहे. Sputnik V असं या लशीला नाव देण्यात आलं आहे. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी त्यांच्या मुलीलाही लशीचा डोस दिला असल्याचे सांगितलं.

हे वाचा - रशियानंतर आता आणखी एका देशानं तयार केली Corona Vaccine, लवकरच करणार घोषणा

रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्युटने अॅडेनोव्हायरसला बेस बनवून ही लस तयार केली आहे. संशोधकांचा असा दावा आहे की या लसीमध्ये वापरलेले पार्टिकल्स स्वत: ची रेप्लिकेट (प्रतिकृती) बनवू शकत नाहीत. मुख्य म्हणजे क्लिनकल ट्रायलदरम्यान संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी या लसीचा स्वत:वर प्रयोग केला होता.

हे वाचा - 20 देशांकडून ऑर्डर; भारतातही दिली जाणार का रशियन लस? AIIMS ने दिली माहिती

दरम्यान या लशीचं शेवटच्या टप्प्यातील ट्रायल पूर्ण न झाल्याने जागतिक आरोग्य संघटनेसह अनेक तज्ज्ञांनी लशीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्हं उपस्थित केले आहेत.

Published by: Priya Lad
First published: August 12, 2020, 3:39 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading