माणसं काय माकडांवरही चाचणी करणार नाही; रशियन कोरोना लशीची अमेरिकेने उडवली खिल्ली

माणसं काय माकडांवरही चाचणी करणार नाही; रशियन कोरोना लशीची अमेरिकेने उडवली खिल्ली

काही अमेरिकन औषध कंपन्या रशियन लशीबाबत (russian corona vaccine) माहिती करून घेण्यासाठी उत्सुकही आहेत, असा दावा रशियाने केला आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 14 ऑगस्ट : रशियाने कोरोना लस तयार केल्यानंतर काही देशांनी या लशीसाठी ऑर्डर दिल्याचा दावा रशियाने केला आहे, तर दुसरीकडे अमेरिकेने मात्र या लशीची खिल्ली उडवली आहे. रशियन लस  Sputnik-V चा आम्ही माकडांवरही चाचणी करणार नाही माणसांवर चाचणी तर दूरची गोष्ट आहे, असं अमेरिकेनं सांगितलं आहे.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, रशियाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, रशियन कोरोना लशीबाबत अमेरिकेला माहिती दिली आहे. अमेरिकेच्या औषध कंपन्यांना अमेरिकेतच ही लस तयार करण्यासाठी परवानगी देण्यासाठीही तयार असल्याचं रशियाने सांगितलं. काही अमेरिकन औषध कंपन्या रशियन लशीबाबत माहिती करून घेण्यासाठी उत्सुकही आहेत, असा दावा रशियाने केला आहे. मात्र या कंपन्यांची नावं रशियाने सांगितली नाहीत.

मात्र रशियाची लस पूर्ण तयार झालेली नाही. त्यामुळे अमेरिका या लशीला गांभीर्याने घेत नाही आहे. व्हाइट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी कायले मॅकनी यांनी सांगितलं, राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना लशीबाबत माहिती देण्यात आली आहे. अमेरिकन लशीला तिसऱ्या टप्प्यातील कठिण अशी चाचणी आणि उच्च मानकांतून जावं लागतं, असं त्यांनी सांगितलं.

हे वाचा - ...तरच भारतात दिली जाणार रशियन कोरोना लस; केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी केलं स्पष्ट

दरम्यान अमेरिकेने रशियन लशीची खिल्ली उडवल्यानंतर रशियानेही उत्तर दिलं आहे. अमेरिकेला लोकांचा जीव वाचवण्यासाठी रशियन लशीबाबत गांभीर्याने विचार करायला हवा, असं एका रशियन अधिकाऱ्याने सांगितलं. रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने अमेरिकेवर निशाणा साधत सांगितलं, "जर आमची लस कोरोनाव्हायरसविरोधात प्रभावी ठरली तर अमेरिकेनं या लशीबाबत गांभीर्याने विचार करून ती मिळवण्यासाठी प्रयत्न का केले नाहीत असा प्रश्न विचारला जाईल"

हे वाचा - शेवटच्या टप्प्यात टेस्ट करणाऱ्या 9 लशींमध्ये रशियन लस नाही; WHO ने केलं सावध

11 ऑगस्टला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आपण जगातील पहिली कोरोना लस तयार केल्याचा दावा केला. मात्र अमेरिका, जर्मनीसह अनेक देशांनी या दाव्यावर प्रश्न उपस्थित केले. जागतिक आरोग्य संघटनेनेही लसीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित करत जगाला सावध केलं आहे. भारतातही गांभीर्याने सर्व बाबी तपासूनच रशियन लशीबाबत योग्य तो निर्णय घेतला जाईल, असं केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी सांगितलं.

Published by: Priya Lad
First published: August 14, 2020, 11:38 PM IST

ताज्या बातम्या