मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

2 महिने दारू बंद! 'हे' Corona Vaccine घेणाऱ्यांना सरकारच्या सूचना

2 महिने दारू बंद! 'हे' Corona Vaccine घेणाऱ्यांना सरकारच्या सूचना

जगातील काही भागात कोरोना व्हायरस लसीकरणाला (Corona Vaccination) सुरुवात झाली आहे. मात्र ज्यांना ही लस देण्यात येत आहे त्यांनी काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे

जगातील काही भागात कोरोना व्हायरस लसीकरणाला (Corona Vaccination) सुरुवात झाली आहे. मात्र ज्यांना ही लस देण्यात येत आहे त्यांनी काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे

जगातील काही भागात कोरोना व्हायरस लसीकरणाला (Corona Vaccination) सुरुवात झाली आहे. मात्र ज्यांना ही लस देण्यात येत आहे त्यांनी काही नियमांचं पालन करणं आवश्यक आहे

  • Published by:  Janhavi Bhatkar

नवी दिल्ली, 10 डिसेंबर: संपूर्ण जगाला सध्या कोरोना व्हायरस लशीची प्रतीक्षा आहे. सध्या यूकेमध्ये (UK) कोरोना लशीकरणाला (corona vaccination) सुरुवात करण्यात आली आहे. कोरोना लशीचा आपात्कालीन वापर सुरू झाला आहे. फायझरची (pfizer) कोरोना लस (covid 19 vaccine) सर्वांना दिली जाते आहे. दरम्यान रशियाच्या स्पुतनिक व्ही (Soutnik V) या लशीबाबतही वेगाने हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र ही लस घेणाऱ्यांना काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रशियामध्ये स्पुतनिक व्ही कोरोना व्हायरस लस घेणाऱ्यांनी लसीकरणापूर्वी आणि नंतर सुमारे दोन महिने मद्यपान करणं टाळलं पाहिजे,  अशी माहिती रशियातील ग्राहक सुरक्षा निरीक्षकांनी मंगळवारी दिली आहे.

ग्राहक हक्क संरक्षण आणि मानवी कल्याण यावर लक्ष ठेवणारी रशियन फेडरल सर्व्हिस 'रोस्पोट्रेबनाडझॉर' (Rospotrebnadzor) च्या मुख्य Anna Popova यांच्या सूचनांवरून उपपंतप्रधा तात्याना गोलिकोव्हा यांनी 42 दिवसांसाठी दारु आणि Immunosuppressants टाळण्याचा सल्ला दिला आहे. कारण या लशीच्या दोन डोसमध्ये 21 दिवसांचं अंतर असणार आहे.

(हे वाचा-कोरोनाची लस घेण्यासाठी Co-WIN अ‍ॅपवर कशी कराल नोंदणी?)

द मॉस्को टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार रेडिओ Komsomolskaya Pravda ला दिलेल्या  एका मुलाखतीमध्ये पोपोव्हा यांनी असं म्हटलं आहे की, 'लसीकरणाच्या दोन आठवड्यांपूर्वी अल्कोहोलचे सेवन थांबणे आवश्यक आहे'. त्यांनी असे म्हटले आहे की, लस घेणाऱ्यांनी पहिल्या इंजेक्शननंतर 42 दिवस मद्यपान न करणं आवश्यक आहे.  या लसीकरणातून रोग प्रतिकारशक्ती तयार केली जात आहे आणि त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.

त्यांनी यावेळी अशी माहिती दिली आहे की, यावेळी शरिरावर मानसिक ताण असणार. निरोगी राहण्यासाठी आणि  चांगला रोगप्रतिकार प्रतिसाद मिळवण्यासाठी अल्कोहोलचं सेवन करू नका. मीडिया अहवालानुसार 2003 पासून वापरात घट होऊनही जगात सर्वाधिक अल्कोहोल सेवन करण्यामध्ये रशियन्स अव्वल आहेत. पोपोव्हा यांनी लसीकरणापूर्वी आणि नंतर धुम्रपान न करण्याचाही सल्ला दिला आहे. कारण तंबाखूच्या सेवनामुळे फुप्फुसांवर परिणाम होते, ज्यामुळे थेट तुमच्या प्रतिकारशक्तीवर परिणाम होईल.

(हे वाचा-बापरे! कोरोना लस घेताच झाला गंभीर संसर्ग; प्रशासनाकडून अलर्ट जारी)

रशियाचे कोव्हिड-19 व्हॅक्सिन स्पुतनिक व्ही च्या नोंदणी-नंतर सुरक्षिततेच्या दृष्टीने क्लिनिकल चाचण्या सुरू आहेत. असे असले तरी उच्च-जोखीम स्वयंसेवकांसाठी लसीकरण मोहीम मॉस्कोमध्ये शनिवार आणि रविवारपासून सुरू झाली आहे. ही लस 95 टक्के प्रभावी असल्याचं त्यांच्या डेव्हलपर्सचं म्हणणं आहे.

First published:

Tags: Corona, Corona vaccine, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus symptoms, World After Corona