फक्त 38 लोकांवर ट्रायल, 144 प्रकारचे साइड इफेक्ट! रशियाच्या लशीबाबत धक्कादायक माहिती आली समोर

फक्त 38 लोकांवर ट्रायल, 144 प्रकारचे साइड इफेक्ट! रशियाच्या लशीबाबत धक्कादायक माहिती आली समोर

जागतिक आरोग्य संघटनेसह (WHO) जगभरातील वैज्ञानिकांनी रशियन लस sputnik-v बाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.

  • Share this:

मॉस्को, 13 ऑगस्ट : रशियाने (Russia vaccine sputnik-v) जगातील पहिली कोरोनाव्हायरस लस (Coronavirus Vaccine) तयार करण्याची घोषणा केली असली तरी या लशीबाबत अनेक प्रश्न अजुनही अनुत्तरित आहेत. बर्‍याच देशांनी ही लस विकत घेण्याची तयारी दाखवली असली तरी, ही लस किती प्रभावी आणि सुरक्षित आहे, हे अजून सिद्ध झाले नाही आहे. या लसीच्या नोंदणी दरम्यान रशियन सरकारने सादर केलेल्या कागदपत्रांवरून (Covid-19 Vaccine) या लशीच्या सुरक्षेबाबत संभ्रम निर्माण झाला. कागदपत्रांमधून प्राप्त झालेल्या सर्वात महत्वाच्या माहितीनुसार, ही लस किती सुरक्षित आहे हे जाणून घेण्यासाठी क्लिनिकल टेस्ट पूर्ण झालीच नाही.

जागतिक आरोग्य संघटनेसह (WHO) जगभरातील वैज्ञानिकांनी रशियन लस sputnik-v बाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. डेली मेलच्या वृत्तानुसार चाचणीच्या नावाखाली केवळ 38 व्हॉलेंटिअर्सचा या लसीचा डोस देण्यात आला. याखेरीज हेही समोर आले आहे की ट्रायलच्या तिसर्‍या टप्प्याबाबत रशिया कोणतीही माहिती द्यायला तयार नाही, WHOनेही हा प्रश्न उपस्थित केला आहे.

वाचा-खूशखबर! नोव्हेंबरमध्ये भारतालाही मिळणार कोरोनाची लस

रशियन सरकारने असा दावा केला आहे की सौम्य तापाशिवाय इतर कोणतेही साइड इफेक्ट दिसून आले नाही. मात्र कागदपत्रांमध्ये असे दिसून आले आहे की 38 स्वयंसेवकांमध्ये 144 प्रकारचे साइड इफेक्ट दिसून आले. चाचणीच्या 42 व्या दिवशीही 38 पैकी 31 स्वयंसेवकांमध्ये साइड इफेक्ट दिसले, याची माहिती मात्र कागदपत्रांमध्ये दिली गेली नव्हती.

वाचा-GOOD NEWS! 2 आठवड्यांत मिळणार कोरोना लस; रशियाने सुरू केलं उत्पादन

अशी झाली रुग्णांची अवस्था

रशियाच्या लशीबाबत सर्वात मोठा प्रश्न म्हणजे रशियाने अद्याप WHOला लशीबाबत माहिती दिली नाही. त्यामुळे रशियाने ही लस बनविण्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन केले नाही आणि म्हणूनच ती माहिती देऊ इच्छित नाही अशी शंका या संघटनेने व्यक्त केली आहे. रशियाचा असा दावा आहे की लसीच्या चाचणीच्या निकालांमध्ये रोग प्रतिकारशक्ती निर्माण होण्याचा पुरावा चांगला आहे. निगेटिव्ह साइड इफेक्ट कोणत्याही स्वयंसेवकात दिसले नाहीत. मात्र, सत्य हे आहे की ज्यांच्यावर या लसीचा ट्रायल करण्यात आला त्यांना ताप, शरीरावर वेदना, शरीराचे तापमान वाढणे, खाज आणि इंजेक्शन दिलेल्या जागी सूज यासारखे साइड इफेक्ट दिसले. त्याशिवाय शरीरातील उर्जा कमी होणे, भूक न लागणे, डोकेदुखी, अतिसार, घश्यात सूज येणे, नाक वाहणे यासारखे तब्बल 144 साइट इफेक्ट दिसले.

वाचा-घाबरू नका, कोरोनाला हरवणं शक्य; भारतातल्या 70% रुग्णांनी करून दाखवलं

रशियाचे वैज्ञानिक डेटा दिला नाही

रशियन राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी स्वतः कबूल केले आहे की जेव्हा त्यांच्या मुलीने लसीचा डोस दिला तेव्हा तिलाही ताप आला होता पण ती लवकरच बरी झाली. पुतीन यांनी असा दावा केला की माझ्या मुलीच्या शरीरात अॅंटिबॉडीज वाढले आहेत. मात्रहा दावा सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा देण्यात आलेला नाही. रशियाने अद्याप या लसीच्या सर्व चाचण्यांशी संबंधित वैज्ञानिक डेटाही सादर केलेला नाही. तिसऱ्य टप्प्यात ट्रायल केला की नाही याबद्दलही शंका आहे.

Published by: Priyanka Gawde
First published: August 13, 2020, 8:48 AM IST
Tags:

ताज्या बातम्या