Home /News /coronavirus-latest-news /

Russia Covid Vaccine : 24 तासांत जगाला मिळणार रशियाची कोरोना वॅक्सिन! 'या' देशाला मिळणार पहिली लस

Russia Covid Vaccine : 24 तासांत जगाला मिळणार रशियाची कोरोना वॅक्सिन! 'या' देशाला मिळणार पहिली लस

लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.

लस कुणाला मिळणार हे ठरवण्यासाठी आणि लसीकरणात प्राधान्य मिळणाऱ्यांच्या याद्या तयार करण्याचं काम सुरू झालं आहे. सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांना तसं कळवून त्यांच्याकडून यासंदर्भातला डेटाबेस मागवण्यात येणार आहे.

12 ऑगस्ट रोजी या लशीची अधिकृत नोंदणी होणार असल्याचे वृत्त आहे. रशियानं केलेला दावा खरा असेल तर ही लस जगातील पहिली कोरोना लस असेल.

    मॉस्को, 11 ऑगस्ट : जगातली पहिली कोरोनाव्हायरस लस (Coronavirus vaccine) रशियामध्ये उद्या (12 ऑगस्ट) रोजी लॉंच होणार आहे. 12 ऑगस्ट रोजी या लशीची अधिकृत नोंदणी होणार असल्याचे वृत्त आहे. रशियानं केलेला दावा खरा असेल तर ही लस जगातील पहिली कोरोना लस असेल. आतापर्यंत कोणत्याही देशाला लशीची अंतिम चाचणी करण्यात यश आलेले नाही आहे. त्यामुळे रशियाची लस उद्या इतिहास रचू शकते. रशियामध्ये कोरोनाची लस ही रशियन आरोग्य मंत्रालयाशी संबंधित असलेल्या गमलेया संशोधन संस्थेनं तयार केली आहे. रशियन आरोग्यमंत्री मिखाईल मुराश्को यांच्या म्हणण्यानुसार जर त्यांची लस चाचणीत यशस्वी झाली तर ऑक्टोबरपासून देशात मोठ्या प्रमाणात उत्पादनही सुरू होईल. रशियाच्या आरोग्य मंत्रालयाने देशातील नागरिकांना दिलासा दिला आणि म्हटले की या लसीकरण मोहिमेतील सर्व खर्च सरकार करणार आहे. वाचा-'या' तारखेला जगाला मिळणार पुण्याची मेड इन इंडिया लस, सीरम कंपनीचा दावा 'या' व्यक्तीला मिळणार पहिला डोस रशियाने फिलिपिन्सला (Philippians) त्यांची कोरोना लस देण्याची ऑफर दिली आहे. फिलिपिन्सचे अध्यक्ष रोड्रिगो दुतेर्ते यांनी ही ऑफर मान्य केली आहे, एवढेच नाही तर या लशीचा पहिला डोस ते स्वत: घेणार आहे. ब्लूमबर्गच्या वृत्तानुसार, "जेव्हा ही लस तयार होईल. तेव्हा सर्वात आधी मी माझ्यावर प्रयोग करणार आहे. मला काही हरकत नाही." दुतेर्ते यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आपले आदर्श असल्याचे याआधीच सांगितले होते. या लसीच्या क्लिनिकल चाचण्यांमध्ये फिलिपिन्सने रशियाला मोठी मदत केली होती. वाचा-सावधान! WHOने कोरोनाबाबत दिला नवा इशारा, धोका आणखी वाढण्याची शक्यता संशोधकांनी स्वत:वर केली होती लशीची चाचणी मॉस्कोच्या गामलेया रिसर्च इन्स्टिट्युटने अॅडेनोव्हायरसला बेस बनवून ही लस तयार केली आहे. संशोधकांचा असा दावा आहे की या लसीमध्ये वापरलेले पार्टिकल्स स्वत: ची रेप्लिकेट (प्रतिकृती) बनवू शकत नाहीत. मुख्य म्हणजे क्लिनकल ट्रायलदरम्यान संशोधकांनी आणि शास्त्रज्ञांनी या लसीचा स्वत:वर प्रयोग केला होता. वाचा-Corona : मुंबईनंतर ठाण्यातही साथ आटोक्यात; पण कुठल्या जिल्ह्यांत वाढतोय धोका? रशियाच्या लशीबाबत संशय रशियाच्या लशीबाबत अनेक देशांनी संशयही व्यक्त केला आहे. जरी रशियन शास्त्रज्ञ लस नोंदवण्याबाबत बोलत असतील तर परंतु जगातील अनेक देश रशियाच्या लसीवर विश्वास ठेवत नाहीत. ब्रिटन आणि अमेरिकेसह बर्‍याच मोठ्या देशांतील तज्ज्ञांनी रशियाने तयार केलेल्या लसच्या सुरक्षेची आणि परिणामकारकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ब्रिटनने ही लस वापरण्यास नकार दिला आहे. या सर्व देशांमधील तज्ज्ञ रशियाच्या लशीबद्दल संशयी आहेत कारण त्यांनी या लशीच्या चाचणीशी संबंधित कोणताही वैज्ञानिक डेटा जाहीर केलेला नाही.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine

    पुढील बातम्या