नवी दिल्ली, 17 ऑगस्ट : लशीच्या स्पर्धेत जगभरात पहिलं स्थान मिळवण्याच्या नादात रशियानं Sputnik-V नावाची कोरोना लस आणली आहे. या लशीसंदर्भात जगभरात अनेक मतमतांतर देखील आहेत तर अनेक डॉक्टरांनी धोक्याचा इशाराही दिला आहे. घाईगडबडीत लस आणण्याच्या नादात लोकांच्या आरोग्याशी खेळ केला जात असल्याचं ही अनेक तज्ज्ञांचं मत आहे.
ऑस्ट्रेलियाचे प्रसिद्ध डॉक्टर आणि ऑस्ट्रेलियन नॅशनल युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक पीटर कॉलिग्नन यांनी म्हटले आहे की घाईघाईने तयार केलेली कोरोना लस कार्य करू शकत नाही आणि त्याचे गंभीर परिणामही होऊ शकतात. या लशीच्या टिकेनंतर पक्षाघात सारख्या गंभीर समस्या उद्भवू शकतात. जागतिक आरोग्य संघटनेत काम करणारे मायक्रोबायोलॉजिस्ट कोलिग्नन म्हणाले की कोरोना लशीचं गडबडीत एक वर्षाआधी उत्पादन केल्याने फायद्यापेक्षा अधिक नुकसान होऊ शकते.
हे वाचा-‘लशी’साठी जीव धोक्यात घालण्यास तयार, 22 वर्षांच्या तरुण शास्रज्ञाने दाखवली तयारी
शनिवारी या लशीच्या उत्पादनातील पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. स्पुतनिक ही कोरोनावरची लस जगाला देऊन पहिल्या क्रमांकाचं स्थान मिळवण्यात राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन गुंतलेले आहेत. कोरोनाची लस आणणारा रशिया हा जगातील पहिला देश ठरला. या लशीची पहिली टिका मुलीला दिल्याचंही त्यांनी सांगितलं. ही लस तयार करताना सुरक्षेची संपूर्ण काळजी घेतल्याचाही दावा ते करत आहेत. पण या लशीवर जागतिक आरोग्य संघनेपासून ते अनेक प्रसिद्ध तज्ज्ञ आणि डॉक्टरांनी टीका केली आहे. कोरोनाच्या महासंकटात सापडलेल्या करोडो लोकांचा जीव या लशीमुळे धोक्यात येऊ शकतो असही काही जणांचं मत आहे.
या लशीनं सुरक्षिची काळजी घेतली नाही आणि मानवी चाचणीचा तिसरा टप्पा देखील पूर्ण केला नाही असा दावा काही तज्ज्ञांनी केला आहे. ऑक्टोबरपासून ही लस बाजारात उपलब्ध होणार असल्यानं ह्या लशीची टीका दिल्यावर किती परिणामांना सामोरं जावं लागणार याची चिंता व्यक्त होत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Coronavirus, Russia