GOOD NEWS! ऑगस्टमध्येच उपलब्ध होणार कोरोना लस; रशियाचा दावा

GOOD NEWS! ऑगस्टमध्येच उपलब्ध होणार कोरोना लस; रशियाचा दावा

दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधीत रशिया आपल्या कोरोना लशीला (Russia corona vaccine) परवानगी देण्याच्या तयारीत आहे.

  • Share this:

मॉस्को, 29 जुलै : कोरोनाव्हायरसविरोधातील लस (corona vaccine) कधी येणार याची प्रतीक्षा प्रत्येकालाच आहे. अशात रशियाने कोरोना लशीबाबत (russia corona vaccine) मोठी घोषणा केली आहे. रशिया (russia) आपली कोरोना लस बाजारात आणण्याच्या तयारीत आहे. विशेष म्हणजे ऑगस्टमध्येच ही लस सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल असा दावा रशियाने केला आहे.

दोन आठवड्यांपेक्षाही कमी कालावधीत रशिया आपल्या कोरोना लशीला परवानगी देणार आहे, असं वृत्त सीएनएनने दिलं आहे.  रशियाच्या अधिकाऱ्यांनी सीएनएनला दिलेल्या माहितीनुसार 10 ऑगस्ट किंवा त्याआधी लशीला परवानगी देण्याच्या दिशेनं तयारी सुरू आहे. मॉस्कोतील गमलेया इन्स्टिट्युटने विकसित केलेली लस आहे. सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात येणारी ही लस सर्वात आधी आरोग्य कर्मचाऱ्यांना दिली जाणार आहे.

 हे वाचा - 24 तासांत 48 हजार रुग्णांची नोंद, तर निरोगी रुग्णांचा आकडा 10 लाखांच्या घरात

रशियाने ही लस विकसित केली असली तरी त्याच्या चाचणीचा कोणताही वैद्यकीय अहवाल रशियाने प्रसिद्ध केलेला नाही. त्यामुळे ही लस किती सुरक्षित आणि परिणामकारक असेल हे सांगू शकत नाही, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.

जगभरात सध्या शेकडो कोरोना लशी तयार करण्यात आल्या आहेत. त्यापैकी काही लशींची प्राण्यांवरील चाचणी यशस्वी ठरली आहे. तर काही लशी ह्युमन ट्रायलच्या टप्प्यात आहेत. या लशींचेही सुरुवातीचे परिणाम सकारात्मक दिसत असले तरी लशीची पूर्णपणे सुरक्षितता समजल्याशिवाय शास्त्रज्ञ लस बाजारात आणण्याची घाई करत नाही आहे. मात्र रशियामध्ये वेगळं चित्र दिसतं आहे. कोरोना लस लवकरात लवकर तयार करण्यासाठी रशियात राजकीय दबाव असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे या लशीच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

कोरोना लशीची माहिती हॅक करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप

दरम्यान ब्रिटन, अमेरिका (US) आणि कॅनडा (Canada) यांनी याआधी असा आरोप केला आहे की रशिया (रशिया) कोव्हिड-19 लस विकसित करणाऱ्या रिसर्च टीमचा डेटा चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. ब्रिटनच्या नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने (NCAC) म्हटले आहे की, रशियन हॅकर्स कोरोनाव्हायरस लस विकसित करण्याचा प्रयत्न करीत असलेल्या रिसर्च टीमना लक्ष्य करत आहेत.

 हे वाचा - आता 6 फूटांपेक्षा जास्त उंची असलेल्यांना कोरोनाचा धोका? वाचा काय सांगतो रिपोर्ट

NCACचा असा दावा आहे की रशियन गुप्तचर सेवेचा एक भाग म्हणून हॅकर्स निश्चितपणे त्यांचे काम करीत आहेत. केंद्राचे म्हणणे आहे की हॅकर्स मॅलवेयरचा वापर करून कोव्हिड-19 लसीशी संबंधित माहिती चोरण्याचा प्रयत्न करत आहेत. NCACचे संचालक पॉल किचेस्टर यांनी याला घृणास्पद कृत्य म्हटले अहे. तिन्ही देशांनी असा आरोप केला आहे ही हॅकिंग करणारी टीम 'एपीटी-29' कोरोनाव्हायरस लस विकसित करणाऱ्या शैक्षणिक आणि वैद्यकीय संशोधन संस्थांमध्ये हॅकिंग करत आहेत. तसेच कोझी बिअर या नावाने परिचित असलेला हा गट रशियन गुप्तचर सेवेचा एक भाग असल्याचेही सांगितले. तर रशियाने हे आरोप फेटाळले आहेत.

Published by: Priya Lad
First published: July 29, 2020, 3:28 PM IST

ताज्या बातम्या