नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी : जगभरात कोरोना व्हायरसची (Corona Virus) गती कमी झाल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान लवकरच कोरोना संपणार असल्याचं सांगितलं जात आहे. काहींनुसार ओमायक्रॉनचा माइल्ड संसर्ग यामागील कारण असल्याचं मानलं जात आहे. मात्र जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) चीफ सायंटिस्ट सौम्या स्वामीनाथन यांनी याबाबत मोठा इशारा दिला आहे. स्वामीनाथन यांनी ब्लूमबर्गशी बोलताना सांगितलं की, महासाथ संपल्याच्या अफवांवर विश्वास ठेवणं आपला मूर्खपणा असेल.
महासाथीचा शेवट कधी होणार याबाबत त्यांचा विचारताच त्या म्हणाल्या की...
याचं उत्तर सध्या कोणाकडेच नाही. महासाथ संपल्याच्या अफवांवर विश्वास ठेवून अलर्टनेस कमी करणं आपला मूर्खपणा ठरेल. कोरोनाचा नवा वेरिएंट कधीही येऊ शकतो. आणि आपण पुन्हा त्याच परिस्थितीत अडकू शकतो. यासाठी आताच सावधान राहणं आवश्यक आहे. अशी आशा आहे की, 2022 च्या शेवटपर्यंत आम्ही योग्य स्थितीत येऊ.
सध्या अमेरिकेसारख्या श्रीमंत देशात लशीचा तुटवडा आहे आणि आफ्रिकेतील अनेक गरीब देशांमध्येही लसीचा अभाव आहे. आफ्रिकेतील 85% लोकांना अद्याप लशीचा पहिला डोस मिळालेला नाही. अशा परिस्थितीत, कोरोनाचे नवे वेरिएंट येण्याची शक्यता आहे. कारण हा विषाणू लोकांमध्ये पसरत चालला आहे.
हे ही वाचा-कोरोना विषाणूचा श्वास नाकातच गुदमरणार! नेझल स्प्रेद्वारे संसर्ग रोखण्याचा उपाय
WHO च्या ज्या टीमने चीनचा दौरा केला होता त्यांना हा व्हायरस प्राण्यांमधून माणसांमध्ये ट्रान्सफर होण्याची शक्यता अधिक होती. हा प्राणी जंगली होता की पाळीव, पक्षी वा इतर काही याबाबत सांगणं कठीण आहे. मात्र निकालावर येणं कठीण आहे. या विषयावर अधिक रिचर्स करण्याची गरज आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona, Corona virus in india, Who