मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'झिंग झिंग झिंगाट'वर रोहित पवारांनी धरला ताल; कोविड सेंटरमध्ये लहानग्यांपासून ते आजींपर्यंत सर्वांसोबत तुफान डान्स, Video Viral

'झिंग झिंग झिंगाट'वर रोहित पवारांनी धरला ताल; कोविड सेंटरमध्ये लहानग्यांपासून ते आजींपर्यंत सर्वांसोबत तुफान डान्स, Video Viral

 रोहित पवारांचा झिंग झिंग झिंगाटवरील डान्स तुफान व्हायरल झाला आहे.

रोहित पवारांचा झिंग झिंग झिंगाटवरील डान्स तुफान व्हायरल झाला आहे.

रोहित पवारांचा झिंग झिंग झिंगाटवरील डान्स तुफान व्हायरल झाला आहे.

  • Published by:  Meenal Gangurde

कर्जत, 24 मे : सध्या राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असली तरी अनेक जिल्ह्यांत रुग्णसंख्येवर नियंत्रण आणणे कठीत जात आहे. जिल्ह्यांमध्ये ठिकठिकाणी कोविड सेंटर उभारण्यात आले असून येथे रुग्णांवर उपचार केले जात आहेत. गेल्या दीड वर्षांहून अधिक काळापासून नागरिक कोरोनाशी सामना करीत आहेत. दिवसेंदिवस कोरोना सेंटरमध्ये राहताना नागरिकांच्या मानसिक स्वास्थावरही परिणाम होत असतो. अशावेळी सकारात्मक मानसिकता ठेवणं गरजेचं आहे.

यासाठी अनेक कोरोना सेंटरमध्ये विविध कार्यक्रमांचंही आयोजन केलं जातं. दरम्यान आमदार रोहित पवार व कर्जत जामखेड एकात्मिक विकास संस्थेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कर्जत तालुक्यातील गायकरवाडी येथील कोविड केअर सेंटरला आ. रोहित पवार यांनी आज सोमवारी भेट दिली. यावेळी रुग्णांशी संवाद साधत त्यांनी रुग्णांना धीर देण्याचा प्रयत्न केला. रुग्णांचे मनोबल वाढावे तसेच त्यांना मनोरंजन म्हणून गायनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आ. रोहित पवार हे रुग्णांच्या चेह-यावरील निराशा दूर करण्यासाठी रुग्णांसोबत सहभागी होत झिंगाट गाण्यावर थिरकले.

हे ही वाचा-अर्रर्र गाडा सुटला; आवरा यांना', ऐन कोरोनाच्या संकटात बैलगाड्यांची शर्यत, Video

राज्य सरकार 1 जूनपासून काही गोष्टींवरील निर्बंध मागे घेण्याच्या तयारीत असल्याचं संकेत विजय वडेट्टीवार यांनी दिलेत. रेड झोनमधील जिल्हे वगळता राज्यातील लॉकडाऊन 1 जूननंतर शिथिल होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे राज्यात सध्या 14 जिल्हे रेड झोनमध्ये असून रुग्णांचा आकडा बघून लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेतला जाणार असल्याचं ते म्हणालेत.

First published:

Tags: Corona updates, Coronavirus, Rohit pawar, Video viral