पालकांसाठी महत्त्वाची बातमी! मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा एम्सचा कोरोना संदर्भातील रिपोर्ट

पालकांसाठी महत्त्वाची बातमी! मुलांना शाळेत पाठवण्याआधी वाचा एम्सचा कोरोना संदर्भातील रिपोर्ट

शाळा सुरू होण्याआधीच वाढली चिंता, एम्सच्या रिपोर्टमध्ये लहान मुलांबाबत व्यक्त केली चिंता.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 नोव्हेंबर : देशातील कोरोना (Corona) रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहेत. परिणामी बर्‍याच राज्यांनी शाळा, महाविद्यालये (School Reopen) सुरू करण्यास सुरुवात केली आहे. काही राज्यांनी शाळा सुरूही केल्या आहेत. तर महाराष्ट्र राज्यानं 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करणार असल्याचे सांगितले आहे. मात्र यात दिल्लीच्या एम्स (AIIMS) रुग्णालयातील कोरोना संदर्भातील रिपोर्टनं पालकांची चिंता वाढवली आहेत.

एम्सने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, सर्व पॉझिटिव्ह रूग्णांपैकी 40% रुग्णांमध्ये लक्षणं दिसत नाहीत. यातील 73.5% रुग्ण 12 वर्षाखालील आहे. अशा मुलांमध्ये कोरोना संसर्ग होतो मात्र लक्षणं दिसत नाहीत. त्यामुळे ही मुलं कोरोना पॉझिटिव्ह आहेत की नाही हे शोधणे फार कठीण आहे.

वाचा-विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! 23 नोव्हेंबरपासून महाराष्ट्रात शाळा सुरू होणार

दुसरीकडे गृह मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या गाइडलाइन्सनुसार देशातील जवळपास 10 राज्यांमध्ये शाळा सुरू झाल्या आहेत. यात उत्तर प्रदेश, बिहार, आंध्र प्रदेश यासारख्या मोठ्या लोकसंख्या असलेल्या राज्यांचा समावेश आहे. एम्सच्या अहवालानुसार, कोरोना संक्रमित 4 पैकी 3 मुलांमध्ये अशी कोणतीही लक्षणे दिसत नाहीत जी इतर मुलांसाठी अतिशय धोकादायक असतात. ही मुले सहजपणे दुसर्‍या मुलास संक्रमित करतात.

वाचा-शाळा सुरू होताच 'या' राज्यात 575 विद्यार्थी, 829 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह

महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू

एसओपी मंजूर झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात 23 नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे. तर इयत्ता 10वी 12 वीच्या परीक्षा मे महिन्यातच होतील अशी माहिती देखील यावेळी त्यांनी दिली आहे. शाळा सुरू करण्याआधी पालकांची परवानगी देखील घेतली जाणार आहे. यासंदर्भात पालकांच्या परवानगीनेच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश देण्याबाबत नियोजन करण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील शाळा आणि महाविद्यालयं बंद ठेवण्यात आली आहे.

वाचा-ताप, खोकलाच नव्हे तर मानसिक गोंधळ उडणं हेही आहे कोरोनाचं प्राथमिक लक्षण

आंध्र प्रदेशात 575 विद्यार्थी, 829 शिक्षक पॉझिटिव्ह

आंध्र प्रदेश राज्यात नववी आणि दहावीचे वर्ग 2 नोव्हेंबरपासून खुले करण्यात आले. त्यानंतर तीन दिवसांतच 575 विद्यार्थी, 829 शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. आतापर्यंत 70 हजार 790 शिक्षक आणि 95 हजार 763 विद्यार्थ्यांची RT-PCR चाचणी करण्यात आली आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: November 6, 2020, 12:54 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading