मुंबई, 1 सप्टेंबर : महाराष्ट्रातील (
Maharasthra) कोरोना रुग्णांची (
Corona patients) आणि कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची (
Corona deaths) संख्या हळूहळू वाढत असल्याचं चित्र दिसत आहे. गेले अनेक दिवस 150 पेक्षा कमी असणारा दैनंदिन मृत्यूचा आकडा आता वाढायला सुरुवात झाली असून गेल्या 24 तासात महाराष्ट्रात 183 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे, तर 4456 नवे रुग्ण आढळून आले आहेत. देशातील काही राज्यांमध्येदेखील कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ व्हायला सुरुवात झाली असून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची
(Third Wave) सुरुवात होत असल्याचे हे संकेत असल्याचं ICMR नं म्हटलं आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांतील आकडेवारीनुसार बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नव्याने आढळणाऱ्या रुग्णांचा आकडा वाढायला सुरुवात झाली आहे. बऱ्या झालेल्या 4430 रुग्णांच्या तुलनेत 4456 नवे रुग्ण आढळून आले आहेत. बऱ्या होणाऱ्या रुग्णांपेक्षा नव्या रुग्णांचा आकडा वाढू लागणं, हे नव्या लाटेचं एक प्रमुख लक्षण मानलं जातं. तर गेल्या 24 तासात 183 मृत्यूंसह महाराष्ट्राचा कोरोना मृत्यूदर 2.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. रुग्ण बरे होण्याचा दर 97.03 टक्के नोंदवला गेला आहे.
ICMR ने दिला इशारा
भारतात लवकरच तिसरी लाट येण्याची शक्यता काही दिवसांपूर्वीच ICMR ने व्यक्त केली होती. आता काही राज्यांतील कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागणं, हे तिसऱ्या लाटेचं लक्षण असल्याचं ICMRनं म्हटलं आहे. ज्या राज्यांना दुसऱ्या लाटेचा फारसा फटका बसला नाही, त्या राज्यांना तिसऱ्या लाटेचा अधिक धोका असल्याचंही ICMRनं म्हटलं आहे.
हे वाचा -
अमेरिकेत डेल्टा व्हायरसचा प्रकोप; बेड, स्टाफ आणि ऑक्सिजनची कमतरता
कुठल्या राज्यांना धोका?
देशात दुसरी लाट ही महाराष्ट्र आणि दिल्लीमध्ये आली होती. या दोन राज्यातील परिस्थिती पाहून इतर राज्यांनी वेळीच पावलं उचलत लसीकरण, निर्बंध आणि नियम काटेकोरे केल्यामुळे त्या राज्यांना दुसऱ्या लाटेचा तुलनेनं कमी फटका बसला. आता या राज्यांना तिसऱ्या लाटेचा अधिक फटका बसण्याची शक्यता ICMRनं व्यक्त केली आहे.
प्रत्येक राज्यानं पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतील कोरोना रुग्णांची संख्या किती होती, याचा आढावा घेऊन तिसऱ्या लाटेसाठी तयारी करावी, असं ICMR नं सांगितलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.